शिवाजी महाराज आणि राजा छत्रसाल
बुंदेलखंड याठिकाणी शहाजहानच्या काळापासून राजा चंपतराय हा राज्यकारभार करत असून
ज्यावेळी औरंगजेबाने बापाविरुद्ध बंड केले त्यावेळी चंपतरायाने त्याला मदत केली होती.तरीपण सत्तेत येताच
बादशाहने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. बलाढ्य शक्तीपुढे आपले काही चालत नाही, हे पाहून चंपत रायाने
आपली पत्नी लालकुवरसह आत्महत्या केली . यावेळी त्यांचा पुत्र छत्रसाल हा ११ वर्षाचा होता.त्याच्या मनात
फार राग होता, परंतु काही करू शकत नव्हता. हताश होऊन त्याने मोगलांची चाकरी धरली. मिर्झाराजा
जयसिंग हा छत्रपती विरुद्ध चालून आला त्यावेळी त्या सेनेत छत्रसाल होता. एक हिंदू राजा
कुठलीही पार्श्वभूमी नसताना सर्व मुस्लीम सत्तेशी निडरपणे लढा देताहेत, याविषयी त्याच्या मनात कुतूहल
निर्माण झाले. तरीपण त्याने मोगल सेनेत राहून भरपूर पराक्रम केला.त्याचे श्रेय मात्र दिलेरखानाने घेतले.
दक्षिणेतील हि मोहीम अशीच संपली .
महाराज आग्र्याहून सुटून आले आणि परत स्वराज्याच्या कामाला लागले. १६७१- ७२ ला
दिलेरखानाच्या नेत्रत्वाखाली परत एकदा छत्रसाल महाराष्ट्रात आला.यावेळी मात्र त्याची इच्छया अनावर
झाली .आणि तो बायका मुलासह रानावनातून, ओढे, नद्या पार करत गुपचुपपणे महाराजांच्या भेटीला गेला.
तेथे राजांच्यापुढे नतमस्तक होऊन त्याने स्वराज्यात चाकरी करण्याची इच्छया व्यक्त केली. महाराजांनी
त्यांना सांगितले कि . तुम्ही पराक्रमी आहात , आमच्याकडे आलात तर तुमचा पराक्रम आमच्यामुळे झाकला
जाईल , तेव्हा तुम्ही जा , मोगालाविरूढ लढा उभा करा . घाबरू नका , ते हत्ती असतील तर तुम्ही सिंह आहात
हे विसरू नका. राजांनी आपल्या कमरेची तलवार काढून छत्रसालाला दिली. आणि म्हणाले जा! आमचे कान
तुमच्या पराक्रमाची बातमी ऐकण्यासाठी आतुर आहेत.
महाराजांची प्रेरणा घेऊन छत्रसालाने बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण केले. ते पुढे १२५ वर्ष
टिकले.१७३० साली याच छत्रसालाची मुलगी मस्तानी बाजीरावाला दिली . १७३१ त्याचे निधन झाले.
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.