Ramsej Fort

                                         संभाजीराजेंचा रामसेज किल्ल्यावरील मावळा 



       नाशिक वणी रस्त्यावर दिंडोरी गावाजवळ रामसेज नावाचा भुईकोट किल्ला असून कोकणानंतर नाशिकनेच  स्वराज्याला मोठी साथ दिली . थोरल्या महाराजांचे निधन झाल्यानंतर १६८१ ला औरंगजेब मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी दक्षिणेत उतरला. सेनापती हंबीरराव मोहित्यांनी बुऱ्हानपूर शहराला आग लाऊन त्याचे स्वागत केले. परंतु त्याच्या खुशमस्कर्यानि ते लुटारू होते म्हणत काम भागवून नेले. 
        मराठ्यांचे एक एक किल्ले घ्यावेत म्हणून त्याने आपला सेनापती शहाबुद्दीन खानला १०,००० फौज देऊन रामसेजवर पाठविले. किल्ल्यात ६०० मावळे आणि किरकोळ रसद होती. तरीपण मावळ्यांनी लढण्याची तयारी केली. शहाबुद्दीनने बाहेरून तोफेचा मारा चालू केला. परंतु  वरपर्यत गोळे जात जात नव्हते. तेव्हा ५० फुटाचा लाकडी दमदमा तयार केला. इकडून मराठ्यांनी गोफणीने दगडाचा मारा चालू केला, तेव्हा एक एक मोगल सैन्य मागे पळायला लागले. बादशाहने त्याच्या मदतीला कासीमखानाला दिले. 
        खानाला एक मांत्रिक भेटला. त्याने सांगितले, मला ५० तोळ्याचा सोन्याचा साप तयार करून द्या. त्याने मी मराठ्यांना जिंकून  दाखवितो. असे  म्हणत तो साप हातात घेऊन किल्ल्याच्या मागच्या बाजूने चालायला लागला. मराठे तयारीतच होते. काही मावळे अगोदरच किल्ल्यामागे पोहोचले होते. त्यांनी पुन्हा एकदा गोफणीने दगड मारायला सुरुवात केली, एक दगड सरळ त्या मांत्रिकाच्या छाताडावर बसला. तसा साप हवेत उडाला आणि मांत्रिक माघारी पाठीला पाय लाऊन पळाला. 
            बादशाहने ६ वर्ष प्रयत्न करूनही रामसेज हाती आला नाही, संभाजी राजांची रणनीती त्याला कधीच कळली नाही. मात्र सतत ६ वर्ष मोगलांना झुलवत ठेवणाऱ्या किल्लेदाराचे नाव इतिहासाला कधीच माहित झाले नाही. अश्या अनेक वीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली म्हणूनच स्वराज्य अबाधित राहिले. 

जय शिवराय !!!!!!!!!!!!! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या