तुळजापुरात मद्य सेवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याबद्दल पेशव्यांचे पत्र

तुळजापुरात मद्य सेवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याबद्दल पेशव्यांचे पत्र 
 १ एप्रिल १७६० 

यादी देवास वगैरे व कामे करावी
सु ।। सितैन मया अलफ छ १४ साबण चैत्र
(पानिपतावर जय मिळावा म्हणून नवस   )
* गोपाळराव गोविंदानी करावी * 

           नवस तुळजापुरी नगारखाना पाठवावा, त्याचे बेगमीस काटी परगनियात गाव लाऊन द्यावे व सरकार तर्फ़ेचा नेवैद्य नंदादीप पूजा नेमून खर्च द्यावा.  तुळजापूर चाकर व जानबा सर्व देवाची दक्षिणा घेतात ते जानबाकडून सोडवावी. पंढरपूर सारिखे देवापुढील सर्व दक्षिणा जमा करून जामदारखाना करावा. देवास खर्च करावा. कर घेऊच नये, करार खर्च असेल तर तो जहागिरीतून करावा. तेथे मद्याचा प्रघात फार तो उत्तम नाही. यास्तव येक कलाल ठेऊन देवीस नेवैद्य मात्र किंचित देत जावा. वरकड कोणी पिणे अगर घेणे करू नये. येणेप्रमाणे करावे. येविसी नेवैद्यास मात्र मद्य द्यावे. देविसही पुसावे, नाही म्हणत नाही. मद्यदेखील सर्व करावे. जानबा पुजाऱ्याने नच देत तर सरकारातून द्यावा.
Ref. ----    पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद खंड ४०,  लेखांक १३२, पान क्र. १२८ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या