भिंगारच्या तुळजाभवानी मंदिरातील ऐतेहासिक तेलाचा घाना
तुळजाभवानी आणि नगरजवळील भिंगार ( बुऱ्हाणनगर ) यांचे नाते फार जवळचे आहे. आई तुळजाभवानीने एका कुमारिकेच्या वेशात जाऊन भिंगरमधील देवीभक्त जनकोजी तेल्याचा घाना चालविला अशी आख्यायिका आहे. आजही जनकोजिच्या पालखीतच देवी सिमोलंघन खेळायला निघतात. त्यानुसार दरवर्षी नगरची पालखी तुळजापुरात आणली जाते.
जनकोजी तेल्याचे तुळजापुरातच निधन झाल्याने त्यांची तेथे समाधी आहे. तर मुळगावी म्हणजे भिंगारला भव्य स्वरूपातील तुळजाभवानी मंदिर आहे. १९०१ साली तेथे मंदिराचे बांधकाम करत असताना जुन्या काळातील तेलाचा घाना सापडला. परवाच तेथे जाऊन याविषयी माहिती घेतली. आजही भिंगारच्या तेल्याच्या रक्ताने टिळा लावूनच देवीच्या सिमोलंघनाची सांगता होते.
satishkadam28@gmail.com
satishkadam28@gmail.com
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.