विजापूरची मुलुख मैदान तोफ बरीच वर्ष परांड्यात होती
साधारणपणे १६ व्या शतकात अहमदनगर येथे हुसेन निझाम शहाच्या काळात चील्बुरूज खान याने एक तोफ तयार केली .त्याचे नाव ''
मलिक ए मैदान' म्हणजे ''मास्टर ऑफ ब्याटलफिल्ड '' . 14.6 फुट लांब व ४. ९ फुट रुंद आणि ५५ टन वजन असून याकरिता पंचधातूचा वापर करण्यात आलेला आहे.याची बनावट तोंडाकडे सिंहाच्या जबड्यात हत्ती पकडलेले असून तोफ ओढण्याकरिता ४०० बैल आणि १० हत्ती
तसेच शेकडो सैनिक लागत होते.प्रथम या तोफेचा वापर तालीकोटच्या लढाईत विजयनगर साम्र्याज्या विरोधात झाला .पुढे मलिक
अंबरने हिचा वापर सोलापूरवर केला. त्यानंतर तोफ परंडा यथील किल्ल्यात ठेवण्यात आली होती.पुढे निझामशाही बुडाल्यानंतर
आदिलशहाचा दिवाण मुरारीपंत पंडिताने ही तोफ २२ ऑगस्ट १६३२ साली विजापूरला आणली. त्यानंतर आज ती विजापुरच्या उपली
बुरुजावर ठेवण्यात आली आहे. तोफेची वात पेटवल्या नंतर सैनिक शेजारच्या विहिरीत उडी घेत असे. जगातील मोठ्या तोफेत हिचा
नंबर लागतो .
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.