nepal tuljabhawani

                                       नेपाळमधील तुळजाभवानी मंदिरे 

नुकतीच नेपाल टूर केली. आई तुळजाभावानीवर संशोधन करत असताना एक हजार वर्षापूर्वी नेपाळमध्ये तुलजाभवानीची मंदिरे असल्याचे वाचण्यात आल्यानंतर नेपाळचा दौरा केला .  त्यानुसार नेपाळमधील भक्तपूर , काठमांडू आणि पाटण येथे तुळजाभवानीचे मंदिर सापडले. अतिशय भव्य मंदिर असून हि मंदिरे राज्याची खासगी मालमत्ता आणि कुलदेवता असल्याने आम जनतेसाठी दसऱ्याच्या दिवशी नवमीला फक्त एक दिवस हे मंदिर उघडे असते . तेथे या देवीला तलेजु देवी म्हटले जाते . बाकी पूजा पाठ आपल्याप्रमाणेच आहेत . मात्र उघडण्याच्या दिवशी  ५४ रेडे आणि ५४ बकऱ्याचा बळी दिला जातो . 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या