ये मराठे नहीं, भूत है !
स्वराज्याचा इतिहास वाचत असताना नेहमी एक प्रश्न पडतो की, स्वराज्यात काय फक्त बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, जिवा महाला एवढ्याच सरदारांनी पराक्रम केला? महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्यात वारंवार एक वाक्य सहजपणे आढळून येते ते म्हणजे ‘सदान् कदा आम्हा युद्धाचा प्रसंग’ . म्हणजेच राजांच्या ३५ वर्षांच्या कार्यकालात अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. दुर्दैवाने मराठ्यांचा समग्र इतिहास उपलब्ध नसल्याने पराक्रमी अशा अनेक वीरांचा इतिहास अज्ञात राहिला आहे.
स्वराज्यासाठी प्रत्येक मावळा आपला प्राण हातावर घेऊन लढत होता. अशा मावळ्यांनी दिलेली एकाकी झुंज आजही कुतुहलाचा विषय ठरली आहे. त्यामुळे मुरारबाजी म्हटलं की पुरंदर आठवतो, बाजीप्रभू म्हटलं की विशाळगड, फिरंगोजी नरसाळाचे नाव घेतले तर चाकणचा रणसंग्राम ध्यानात येतो तसं मायनायक भंडारीच्या रूपाने खंदेरीचा पराक्रम दिसतो. मग प्रश्न पडतो की, महाराजांच्या शिलेदारांनी एवढ्याच लढाया केल्या का? सूर्यराव काकडे हे शिवरायांचे बालमित्र होते हे इतिहासकारांनी सविस्तर सांगितलेच नाही. तर रामाजी पांगेरा हे नाव तर स्वराज्याचा बारकाईने अभ्यास करणा-याशिवाय इतरांना माहीतच नाही. शिवरायांच्या पायदळातील एका तुकडीचा जुमलेदार असणा-या रामाजीचा पराक्रम आपण इथे पाहणार आहोत. त्याने मोगलांच्या फौजेशी दिलेला लढा लष्कराच्या कोणत्या डावपेचात बसतो हे आजवर कुणालाही उमगलेले नाही.
इंग्रज मोठे चलाख होते. १६६४ साली राजांनी पहिल्यांदा सुरतेवर स्वारी करताच इंग्रज व्यापा-यांनी आपला विमा उतरून घेतला होता. परंतु मोगलांनी ही स्वारी सहज घेतली आणि ऑक्टोबर १६७० ला महाराजांनी सुरतेला दुसरा धडाका दिला. अगणित संपत्ती मिळाली. त्यातून किल्ल्यांची डागडुजी सुरू झाली. मराठ्यांनी बसनूर, ब-हाणपूर, औरंगाबाद, साल्हेर, बागलान झोडून काढले. बागलान (आजचा नाशिक) परिसरातील अहिवंत, मार्कंड, जवळा, अचलगड, साल्हेर, रामसेज यासारख्या किल्ल्यावर वर्चस्व निर्माण केले. अशा वेळी काय करावे ही औरंगजेबाला धास्ती लागून राहिली. लाखाची फौज पाठविली तो शिवाजीने ठोकून काढली. शाहजाद्यांना पाठवावे तर तेच फितूर होऊन शिवाजीला मिळाला तर? आपण जावे तर शाहिस्तेखानाप्रमाणे खास्ता झाली तर? अशा अनेक प्रश्नांत बादशहा गुंतून गेला होता.
शिवरायांसाठी नेहमीच अडचणीचा विषय ठरलेला दिलेरखान बहादुरखान कोकलताश, इकलासखान मियाना, मुहकमसिंग चंद्रावत, अमरसिंह राय मकरंद यांसारख्या सेनानीसह बागलानात येऊन दाखल झाला. त्यांनी साल्हेरीला वेढा घातला. तेव्हा सेनापती प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे यांनी त्यांची बाहेरून लांडगेतोड सुरू केली. मोगलांनी आपल्या फौजा विस्तारित करून एक-एक किल्ला घेण्यासाठी प्रत्येक सरदारावर
स्वतंत्र जबाबदारी सोपविली. त्यानुसार दिलेरखानाने आपल्यासोबत ३० हजारांची फौज घेऊन रनाळ्याला वेढा दिला. रनाळा, मार्कंड, घोडप, कण्हेरगड हे बागलानातील
किल्ले वणीच्या सप्तशृंगीदेवीच्या परिसरात धनदाट जंगलात वसलेले होते. वणी दिंडोरीपासून १८ कि. मी. वर चांदवडजवळ पर्वतरांगांनी हा प्रदेश गर्द झालेला आहे.
साल्हेरीच्या भोवतीला मराठ्यांनी मोगलांना बेजार केल्याने दिलेरखानाने रनाळ्याला वेढा दिला. प्रतापराव
गुजर किंवा मोरोपंत पिंगळे हे घोडदळाचे सेनापती होते.
घोडदळाच्या साह्याने गनिमीकाव्याची युद्धे शक्य होतात; परंतु पायदळाला तेवढा वेळ मिळत नाही. परंतु स्वराज्याच्या शिपायांना हा विचार करायलाही वेळ कुठे होता. किल्ल्याला वेढा घालणा-या दिलेरला हुसकावून लावण्यासाठी पायदळातील एक हजार फौजेचा अधिकारी असणा-या रामाजीने दिलेरखानाला डिवचले. मिर्झाराजासोबत पुण्याकडे जाताना असेच पुरंदरजवळ खानाला डिवचल्याने पुरंदरचा तह स्वीकारावा लागला होता. एकंदरीतच मराठ्यांच्या शत्रूत दिलेरखान हा शेवटपर्यंत भारी ठरलेला दिसून येतो. तर रामाजी पांगेराने अफझलखान भेटीप्रसंगी निकराची लढाई दिलेली असल्याने तोही गनिमीकाव्यात पारंगत होता. सापाच्या शेपटीवर पाय पडल्यावर तो जसा चवताळावा त्याप्रमाणे दिलेर त्याच्या मागे लागला. तर रामाजीला पळण्याच्या बहाण्याने खानाला कण्हेर गडाच्या पायथ्याशी एका दरीत गाठायचे होते.
हजार-पाचशे मावळ्यांमागे दिलेरखानाची ३० हजार फौज पाठलाग करायला लागली. चांदवड, कळवण व आताची कण्हेरवाडीजवळ गावालगत कण्हेरगड उभा आहे. या ठिकाणी रामाजीने योजना आखली. दिलेर
खानाने दस्तुरखुद्द शिवाजी राजांनाही नाकीनऊ केले तिथे आपण कसा मुकाबला करावा ही कल्पना तयार होती. इच्छितस्थळी आल्यानंतर रामाजीची फौज थांबली. तिथे अगोदरच बाकीची तयारी झालेली होती. प्रसंग मोठा बाका होता. लढाई विषम होती. पण मराठ्यांना मरणाची भीतीच नसल्याने मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. रामाजीने सहका-यांना जवळ बोलावले आणि सांगितले, जे आपलेसोबत असतील ते उभे राहणे. याचबरोबर ‘लढाल तर सोन्याची कडी, पळाल तर चोळी-बांगडी’ असे आवेशपूर्ण वाक्य उच्चारताच ७०० हशम उभे राहिले.
रामाजीची ही लढाई जगाच्या पाठीवरील एक वेगळीच लढाई ठरणार होती. मावळ्यांनी संपूर्ण कपडे उतरविले. अंगाला काळे फासले, हातात मशाली घेतल्या. दिलेरखानाची फौज समोर येताच जंगली आदिमानव दिसावेत या वेशात मराठे मोठमोठ्याने ओरडत खानाच्या फौजेपुढे नाचायला लागले. वाळवंटी प्रदेशात लढणा-या मोगली फौजेला ही काय भानगड आहे हे समजायला तयारच नव्हते. सभासद बखरीत याचे वर्णन अतिशय मार्मिकपणे सांगितले आहे. त्यानुसार, दिलेरखान याची फौज पायउतार होऊन चालून घेतले. चौफेरा मावळे लोक वेढिले. एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले.
रामाजी पांगेरा बेभान होऊन ठरलेल्या रणनीतीसह खानाच्या फौजेवर तुटून पडला. मशाली घेऊन नाचणा-या या जंगली माणसांनी मोगलांची फौज कापून काढायला सुरुवात केली. १५०० पठाणांना यमसदनास पाठविले. तेव्हा कुठे खानाच्या लक्षात आले, हे जंगली मानव वगैरे काही नसून शिवरायांचे मावळे आहेत. तेव्हा तो रामाजीवर तुटून पडला. आत ‘हर हर महादेव’ च्या घोषणा सुरू झाल्या. एवढ्या मोठ्या संख्येपुढे रामाजीचा टिकाव लागणे शक्य नव्हते. रामाजीला रूपाजी नळगेसारख्या सहका-यासह वीरमरण प्राप्त झाले.
दिलेरखान चकित होऊन रामाजीचा पराक्रम पाहतच राहिला. एक एकास वीस वीस तीस तीस जखमा तिराच्या, बर्चीच्या लागल्या. लोक मेले. मोठे युद्ध झाले. मग दिलेरखान यांनी तोंडात अंगोली घालून एक घटका आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले, ‘ये मराठे नही, भूत हैठŸ।’ रवळा , कण्हेरगडाची मोहीम अर्धवट सोडून दिलेरखान परत फिरला. खरं तर हा रामाजीचा विजय होता. कारण पुढील हालचालीवरून खानाला त्याला रोखायचे होते. त्यात तो यशस्वी ठरला होता. इच्छाशक्तीच्या जोरावर हत्याराविना उघडेबोडके होऊनही युद्धात यशस्वी होता येते हे शिवरायांच्या या मावळ्याने दाखवून दिले आहे.
रामाजीच्या पराक्रमाची वार्ता राजांच्या कानावर गेली आणि दु:खद बातमीने त्यांचे मन हेलावून गेले. स्वारीवर असताना राजांनी रामाजीचे गाव कोरजाईला भेट दिली. तेव्हा रामाजीचे वडील मारुतीचे त्यांनी सांत्वन करून रामाजीचा वडीलबंधू रूपाजीला भावाची जागा देऊन स्वराज्यात सामिल करून घेतले.
वणीच्या देवीपासून अगदी २० कि.मी.वर कण्हेरगड आहे. गडावर पाण्याच्या एक-दोन टाक्या सोडल्या तर एक भिंतही शिल्लक नाही. रामाजीची कुठं समाधी नाही. जिथं इतिहासाला त्याचा पराक्रमच नीट माहीत नाही तिथं समाधीचा विषय येतोच कुठे? परंतु कण्हेरगडाच्या पायथ्याला गेल्यावर रामाजी पांगेरा उभा राहतो तो म्हणजे आपल्या पराक्रमाच्या जोरावर. गडाच्या पायथ्याला कण्हेरवाडी
नावाचं छोटंसं गाव आहे. नुकत्याच निवडणुका झाल्याने ऐ-यागै-यांची पोस्टर्स तिथं दिसली मात्र रामाजीचा पराक्रम सांगणारा एकही शिवरायांचा वारसदार तिथं दिसला नाही. खानाप्रमाणे उद्विग्न होऊन आम्हीही माघारी फिरलो मनामध्ये रामाजी पांगेराच्या यशाची गाथा घेऊन. रामाजीसारख्या अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली म्हणून पुढे स्वराज्याचा डंका वाजत राहिला.
डॉ. सतीश कदम satishkadam28@gmail.com

मोबा. ९४२२६ ५००४४
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.