नांदूरघाट येथील महादजी शिंदेच्या पत्नीची समाधी
हा पुत्र झाला होता. रजपुतात एक विवाह नवरदेव स्वत: हजर उपस्थित राहून केला जातो. तो दुसरा नवरदेव
आपली खांडा म्हणजे तलवार पाठवून केलेला विवाह. मात्र याला समाजात तेवढी मान्यता नव्हती म्हणून महादजीच्या जन्मावरून खालवर बोलले जाते. त्यानुसार महादजीचा जन्मकाळ सन १७२७ मानला जातो.शिंदे घराण्याचा इतिहास पाहिल्यास मराठी साम्राज्याकरिता दत्ताजी, तुकोजी, जयाजी अशा अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. गंभीर जखमी झालेले असतानासुद्धा अहमदशहा अब्दालीला ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असे म्हणणारा दत्ताजी हा याच घराण्यातील होय. स्वत: महादजी हा १४ जानेवारी १७६१ च्या तिस-या पानिपत युद्धात लढून एका पायाने कायमचा लंगडा झालेला होता. पानिपत युद्धामुळे
मराठ्यांच्या साम्राज्यावर शोककळा पसरली. त्यातच अगदी तीस वर्षाच्या महादजीवर घरातील सर्वांचीच जबाबदारी येऊन पडली. शिंदे घराण्यातील अनेकांनी आपले प्राण अर्पण केल्याने दोन चार वर्षांत अनेक बायका विधवा झाल्या.घरातील विधवा बायका-आई निंबाबाई व चिमाबाई, जयाप्पाची बायको सखूबाई,
दत्ताजीची भागिरथीबाई व जयाजीची सगुणाबाई यांच्यातील
कुरबुरीमुळे त्याला काही काळ झगडावे लागले. महादजीने केवळ आपल्याच लोकांना धीर दिला असे नाही तर राघोबा व माधवराव संघर्षात छत्रपती रामराजाकडेही लक्ष पुरविले. डी बॉयन व त्याचा विश्वासू सेनापती राणेखानच्या नेतृत्वाखाली
माधवरावाने १ लाख ५७ हजार फौज बाळगत पेशव्याच्या एकूण १० कोटी महसूलापैकी महादजीच्या पराक्रमाची साक्ष देणारी अनेक कागदपत्रे कोटा राजस्थानमधील
पुरालेखागारात उपलब्ध आहेत.
दुर्दैवाने महादजीची मुले जगत नव्हती म्हणून त्याचे एकूण नऊ विवाह केले.
१. अन्नपूर्णाबाई - बीडच्या निंबाळकर घराण्यातील
२. भवानीबाई - घाटगे घराणे
३. पार्वतीबाई - नरसिंगराव घाटगे यांच्या बहिण
४. भवानीबाई - संगमनेरच्या देशमुख घराण्यातील
५. गंगाबाई - पलवेकर घराण्यातील
६. राधाबाई - पद्मसिंग राऊळ घराण्यातील
७. भागीरथीबाई - कर्डेकर घराणे
८. यमुनाबाई - राऊळ घराणे
९. लक्ष्मीबाई - आनंदराव कदम भोपे घराणे श्री क्षेत्र तुळजापूर (सध्या हे घराणे कोल्हापूर या ठिकाणी भोपेराव नावाने स्थायिक झालेले असून त्यांना कोल्हापूर संस्थानात पूजेचा मान आहे.)
महादजी पानिपतावर लढत असताना त्यांच्या जिवीताला धोका पोहोचू नये म्हणून त्यांच्या प्रथम पत्नी बीडच्या निंबाळकर घराण्यातील अन्नपूर्णाबाई यांनी बीडच्या
मन्सूरशाहची उपासना केली होती.
महादजी अनेक संकटातून वाचून आल्यामुळे महादजीचीही मन्सूरशहावर श्रद्धा बसली होती. महादजी ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मगुरुला मानत होता त्याचप्रमाणे तो आपल्या देवदेवतांचीही मनोभावे पूजाअर्चा करत होता.
महादजीने खूप मेहनतीने शिंदे घराण्याची गादी टिकविली परंतु त्याच्यापुढील अडचणी कधी कमी झाल्या
नाहीत.
उत्तरेकडील परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर महादजी जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा तो आवर्जून बीडच्या मन्सूरशहा दर्गाच्या दर्शनासाठी बीडला गेला होता. तेथील दग्र्याच्या बांधकामाची व्यवस्था लावल्यानंतर तेथून तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना वाशी (सध्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण) येथे कल्याणराव कवडेंना महादजींची बहिण दिली होती त्यांना भेटण्यासाठी गेले. तेथून तुळजापूरला दर्शनासाठी निघाले असता त्यांचा मुक्काम नांदूरघाट ता. केज, जि. बीड याठिकाणी पडला असता १६ एप्रिल १७९२ रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीचे सुतक
पडल्यामुळे महादजीचा मुक्काम तेरा दिवस नांदूरघाटला होता. लिखीत साधनाआधारे प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिल्यानंतर नांदूरघाट येथील ओढ्याच्या काठावर स्वत: महादजीने बांधलेली समाधी चबुत-यावर जिर्ण अवस्थेत आहे. लिखित साधनाच्या आधारे ती समाधी महादजीची पत्नी राधाबाई असल्याचे दिसून येते तर स्थानिक जाणकार ती समाधी अन्नपूर्णाबाईची असल्याचे सांगतात. महत्त्वाचे म्हणजे दोन चार जाणकाराशिवाय इतरांना याविषयी काहीच माहिती नाही. याविषयी वर्तमानपत्रातून मोठी बातमी प्रसिद्ध करून याविषयी आवाहन करण्यात आले होते. आपल्याकडे इतिहासाची अस्था नसल्याने अशा वास्तुंची मोठी परवड होताना दिसून येते. या देशात प्रथमत:च इंग्रजांप्रमाणे दोन लाखाची तैनाती फौज बाळगणा-या व मराठ्यांचे साम्राज्य आपल्या कर्तृत्वाने तोलून ठेवणा-या थोर पुरुषाच्या पत्नीच्या समाधीची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
विशेष म्हणजे महादजीच्या पत्नीची समाधीचा शोध घेतला असता त्यापैकी इतरही काही ठिकाणचा अंदाज घेता आला आहे. त्यानुसार भागीरथीबाईची समाधी नगरला, गंगाबाईची समाधी मेवाड राजस्थान, यमुनाबाईची वारा- णशी तर तुळजापूरकन्या लक्ष्मीबाईची समाधी दतिया मध्यप्रदेश येथे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्राप्त झालेल्या नांदूरघाटच्या समाधीविषयी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नांदूरहून महादजी तुळजापूरला गेला व त्याठिकाणी त्याने तुळजाभवानीचे भोपे कदम यांचेकडे मुलगी देण्याविषयी निकड लावल्याने भोपे अमरसिंग व भुतोजीराव पळून गेले. तर महादजीने आपला हट्ट पूर्ण करत वयाच्या ६८ व्यावर्षी १४ वर्षाच्या लक्ष्मीबाई नावाच्या आनंदराव भोपे कदमच्या मुलीशी लग्न केले.
तेथून त्याने पुण्याकडे प्रयाण केले. रस्त्यातच महादजीला ताप यायला सुरुवात झाली होती. बरेच इलाज झाले त्याचा काही फरक न पडता दि. १२ फेब्रुवारी १७९४ ला पुण्याजवळील वानवडी येथे महादजीने अखेरचा श्वास घेतला.
आज पुण्यातील वानवडीची महादजीची समाधी ज्याला छत्री म्हटले जाते ती सुशोभित आहे. मात्र त्या वेळी त्यांच्या पत्नीची समाधीची अवस्था पाहिल्यानंतर समाधीतही स्त्रियावर अन्यायच होत असल्याचे दिसून येते.
डॉ सतीश कदम
सप्तरंग पानावरून
- अगणित डॉन
- निर्गुडी
- विवेकसिंधु
- दिवस ‘बोअर’ ना म्हणायचे
- ऑनलाईन शॉपिंगचे विस्तारते क्षितीज
- स्वप्न नव्या राजधानीचे
- तुळजाभवानीचा पलंग आणि पालखीचा अनोखा प्रवास
- जगाला बदलण्याचा अट्टाहास सोडा
- छम, छम... बंदी हवीच
- बंदी आवश्यकच !
- तूर
- विवेकसिंधु
- पालथ्या घड्यावर पाणी
- ‘वस्त्रहरणकारां’ चा सन्मान
- माता न तू वैरिणी
- निदान खानदानी माणूस याप्रमाणे कामास आले
- ऐकावे जनाचे, करावे मनाच
- नाझी राजवटीने मानवावर केलेल्या अत्याचाराची कहाणी
- मुखे नाम उच्चारितीŸ। व्यवहार अधोगामी करितीŸ।
- नोक-यांचा अनुशेष
- सेना सत्तेबाहेर पडणार ?
- हरभरा
- विवेकसिंधु
- विजयादशमीचा भावार्थ
- स्मारक बनावे प्रेरणाभूमी
- Developed By Vinod Mali-8805989500, Deepak Jadhav-8805989506
© 2013 Copyright IEPL. All Rights reserved.
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.