छ्त्रपती शिवरायांच्या नावाच्या परराज्यातील शैक्षणिक संस्था


छ्त्रपती शिवरायांच्या नावाच्या परराज्यातील शैक्षणिक संस्था


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 ते शनिवार दिनांक 3 एप्रिल 1680 असा 18306 दिवसांचा धगधगता प्रवास. म्हणजेच जेमतेम 50 वर्षाचे आयुष्य. त्यातही स्वारीवरील दिवस हे फक्त 2052 च आहेत आणि यात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राबाहेरील वास्तव्याचे दिवस आहेत 1194. तरीसुद्धा आपल्या 35 वर्ष्याच्या राजकीय कारकिर्दीत सार्‍या जगाला या राजाने मोहित केले. महाराष्ट्रच नाहीतर भारतातील संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव पराक्रमाशी जोडलेले आहे. त्यामुळे यांच्या कर्तृत्वाचा सुगंध नवीन पिढीला ज्ञात व्हावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक संस्थांना राजेंचे नाव दिलेले आहे. यात काही विशेष नाही, परंतु देशातील जवळपास सर्वच मोठ्या राज्यात शिवरायांच्या नावाने शैक्षणिक संस्था असून त्याची यादीच पुढे दिलेली आहे. यात काही मला भवलेल्या संस्थांची माहिती घेतल्यानंतर राजेंचा सार्थ अभिमान वाटतो.

1. आंध्र प्रदेशातील जंगारेड्डीगुडम हे छोटेशे गाव परंतु गावाला स्वातंत्र सेनानी आणि सर्वोदयी चळवळीचे उपासक राहिलेल्या V. P. मुर्तीराजू यांनी 1957 साली छत्रपती शिवाजी त्री सथ जयंती या नावाने शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. पुढे संस्थेच्या नावाने 1974 साली वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली. संस्थेच्या गेटवरच महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. आत येतानाच राजेंचे विचार मनात घेऊन जावे हा त्याठिकाणी पुतळा बसविण्याचा हेतु होता. राजेंची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते. राजेंच्या विचारावर प्रेरित होऊन झपाटलेल्या मुर्तीराजुना सलाम.

2. पश्चिम बंगाल म्हणजे कधीकाळी श्रीमंत रघुजी भोसले नागपूरकर यांच्या दहशतीखाली राहिलेला भाग. 1742 ते 1803 अशी 60 वर्ष मराठ्यांनी बंगाल प्रांतातील ओडिशा भागावर आपले साम्राज्य गाजविले. त्यामुळे अनेक जमीनदार, कारागीर, शेतकरी वा इतर मराठी माणूस या भागात स्थिरावला. त्यातूनच बंगालमधील हावडा जिल्ह्यातील उलबेरिया या छोट्याशा गावात छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय आहे. 70 वर्षापासून आजतागायत जीआय शाळा टिकून आहे. 

3. दक्षिणेप्रमाणेच उत्तर भारतातही महाराजांच्या विचाराचा पगडा किती मोठा होता. हे उत्तर परदेशात असणार्‍या जवळपास 16 शैक्षणिक संस्थावरुन दिसून येतो. अशाच एका मला भावलेल्या शाळेची स्थापना 1961 साली झालेली असून ती खजुरौल, मिर्जापुर याठिकाणी असून तेथे 12 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेची इमारत आणि त्यावर लिहिलेले छत्रपती शिवाजी कॉलेज, खजुरौल उत्तर प्रदेश वाचले की शिवरायांच्या विचाराने छाती भरून येते. अशा अनेक संस्था आहेत. तरीपण राज्यवार मला दिसलेल्या संस्थांची आकडेवारी पुढीलप्रमाणे – ( Pro. Dr. Satish Kadam, Tuljapur 9422650044 )

1. उत्तर प्रदेश – 16
2. कर्नाटक – 10 
3. मध्य प्रदेश – 05 
4. गुजरात – 04 
5. आंध्र प्रदेश – 03
 6. दिल्ली – 02
 7. गोवा -02
8. हरियाणा – 02 
9. तमिळ्नाड – 02 
10. राजस्थान – 02 
11. बिहार – 02 
12. पंजाब – 02 
13 . छत्तीस गड – 01 
14 . केरळ
15. तेलंगणा – 01 
16. उत्तरा खंड – 01 
17. झारखंड – 01
 18. बंगाल – 01





 – 01Image may contain: plant, tree and outdoor

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या