कर्नाटकातील शेतकऱ्याचा पोर श्रीनिवास गौडा जगातला सर्वात वेगवान धावपटू
काय सांगते वेगाचे रेकॉर्ड - २००९ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत जमैकाचा धावपटू हुसेन बोल्टने १०० मीटर धावण्यासाठी ९. ५८ सेकंदाचा वेळ घेतला होता. जे आतापर्यंतचे जागतिक कीर्तिमान म्हणजेच रेकॉर्ड आहे. परंतु हे रेकॉर्ड भारतातील एका शेतकऱ्याच्या पोराने तोडले आहे.
कोण आहे श्रीनिवास गौडा -
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मुदाबिदरी गावचा रहिवाशी असलेला श्रीनिवास गौडा हा २८ वर्षीय शेतकऱ्याचा मुलगा असून शेतातील कामात तो फारच चपळ आहे. मागच्या आठवड्यात उडपी परिसरात झालेल्या कम्बाला नावाच्या शर्यतीत त्याने केलेल्या अफलातून कामगिरीमुळे तो जगभर चर्चेततर आलाच शिवाय भारताचे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी हि बातमी वाचून गौडाला आता थेट ऑलिम्पिकला पाठविण्याची तयारी सुरु केली आहे.
कम्बाला खेळ -
महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धेप्रमाणेच कर्नाटकातील उडपी आणि मेंगलोर परिसरात हि कंबाला स्पर्धा फारच गाजलेली स्पर्धा असून या खेळात दोन म्हैशीला एका लाकडाला ( शिवळाला ) जुंपून अतिशय पातळ चिखलाच्या पाण्यातून पळविले जाते. बैलगाडीप्रमाणे पाठीमागे गाडीवगैरे काही नसते. तर त्याऐवजी दोन म्हैशी पळवत न्यायच्या असतात. यावेळी १४२. ५० मीटरचे अंतर कापण्यासाठी श्रीनिवासने १३. ६२ सेंकंदाचा वेळ घेतला. कंबाला असोशिएशनचे अध्यक्ष प्रोफेसर गुणपाला कदंब यांनी याबाबत सकारात्मक विचार करून श्रीनिवासच्या कामगिरीला प्रसिद्धी दिल्याने थेट बीबीसी ने या बातमीची दखल घेतली.
हि बातमी वाचून प्रसिद्ध उदोगपती आनंद महेंद्र यांनी हि पोस्ट आपल्या ट्विटरवर शेअर केली. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरु झाली. आणि शेवटी क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी श्रीनिवासला थेट भारतासाठी खेळण्यासाठी संधी देण्याचे जाहीर केले.
पुढे काय -
जागतिक कीर्तीचा धावपटू हुसेन बोल्टला खूप सराव केल्यानंतर १०० मीटरसाठी ९. ५८ सेंकंद लागतात तर श्रीनिवास चिखलातून पळताना हेच १०० मीटर अंतर पार करण्यासाठी फक्त ९. ५५ सेंकंद घेतो. शिवाय त्याला हे म्हैशींना सोबत घेऊन चिखलातून पळावयाचे असते. तरीसुद्धा हुसेनपेक्षा त्याला तब्बल ०. ०३ सेकंद कमीच लागतात. श्रीनिवासला आता साई क्रीडा अकादमीत योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी तो दिल्लीला रवाना झाला आहे. शेतकऱ्याच्या या पोराला खूप खूप शुभेच्छा >>>>> dr. satish kadam

0 टिप्पण्या
pls tell me what your mind.