‘’ शिवाजी पहाड का चुहा तर हो ची मिन्ह सुरंग का चुहा ”
( Mountain rat & Tunnel rat )
इ. स. 1645 ते 1680 आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलांना आपल्या गनिमी काव्याने हैराण करणार्या शिवरायांना मोगलांनी नेहमी एक उपाधी लावली शिवाजी तो क्या पहाड का चुहा है. त्याच्या मागचे मर्म त्यांना कधी कळलेच नाही. कमी सैन्य बळाच्या जोरावर अधिक ताकतीच्या शत्रूवर अचानक हल्ला करून पळून जाणे हे गनिमी काव्याचे तंत्र होते. गनिमी काव्यासाठी सह्याद्रीचा डोंगर हे वरदान होते. त्यामुळे या डोंगराचा आधार घेत शिवरायांनी आपल्या शत्रूवर मात केली. परंतु मोगलासारखे शत्रूमात्र शिवरायांना डोंगरातला उंदीर म्हणजेच पहाडका चुहा म्हणायचे.
“ झटपट चावा आणि चटपट समझोता” हे युद्धाचे मुळ आहे. गनिम या शब्दाचा अर्थ होतो शत्रू, तर कावा म्हणजे घोड्याने घेतलेला फेरा, गनिमपासून गनिमाई शब्द आला, तर काव्यापासून कावेबाज शब्द तयार झाला. या अर्थाने शत्रूने धूर्तपणे केलेला हल्ला म्हणजे गनिमी कावा. त्यामुळे शत्रू ताकतीने जास्त असलेतरी मराठ्यापुढे टिकाव धरू शकले नाहीत. गनिमी काव्याच्या युद्धाकरिता त्या त्या भागातील नैसर्गिक परिस्थिताचा आधार घ्यावा लागतो. त्यानुसार शिवरायांनी डोंगराचा आधार घेतला. वास्तविक पाहता गनिमी काव्याचे तंत्रज्ञान हे अति प्राचीन असून रशियात याला कोस्याक म्हटले गेले, अफगाणी लोक याला बर्गीगिरी, जंग ए गुरेजी तर पाश्चत्यांनी याला guerrilla warfare म्हटले. चीनमध्ये इ. स. 4 त्या शतकात याचा वापर केलेला आहे. इंग्लंड मध्ये 15 व्या शतकात तर रशियाने नेपोलियनच्या स्वारीच्यावेळी वापरलेले “ दग्दभू’ “ धोरण हे गनिमी काव्याचेच अंग होते. दुसर्या महायुद्धात युगोस्लाव्हीयाने नाझी सैन्याला गनिमी काव्यानेच जेरीस आणले होते.
तर मराठीत लढण्याच्या या पद्धतीला गनिमी कावा म्हटले गेले. यामध्ये “ शत्रूच्या प्रस्थापित बळास खच्ची करणे, गनिम सेनेस नामोहरण करण्याकरिता शत्रूस प्रचंड शस्त्रास्त्र व सैन्यबळ खर्ची करावे लागेल अशी परिस्थिति निर्माण करणे”. हे महत्वाचे असते. त्यातूनच बेसावध शत्रूवर रात्री बेरात्री हल्ला करणे, लुटालूट करणे,वाटा अडविणे, रसद तोडणे यासारख्या गोष्टीचा वापर केला जातो. यात I have saved my self हे गनिमी काव्याचे आद्यतत्व आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गनिमी काव्यात देशप्रेम हा घटक अंतिम मानला जातो, त्यामुळे गनिमी काव्याने लढणारा सेनानी प्राणाची पर्वा करत नाही. मोगलांना शेवटपर्यन्त मराठ्यांच्या या नीतीचा अंदाज आला नाही, त्यामुळे देवीसिंग चौहान म्हणतात, “ कृष्णसमान गनिमी कावा, जिससे मुगलो ने भय पाया”. सह्याद्रिचा सहारा नसता तर मराठ्यांना म्हणजेच शिवरायांना येवढे यश मिळविता आले असते का ? हा प्रश्न पडतो. ज्या शिवरायांनी डोंगर कपार्याचा वापर आपल्या युद्ध तंत्राकरिता केला, आणि कुठलाही सेनानी आपल्या भागातील भौगोलिक साधनाचा आधार घेतच असतो, मोगलांना याचे मर्म न कळाल्याने त्यांनी शिवरायांना ‘ पहाड का चुहा’ म्हटले.
गनिमी काव्यात अचानक हल्ला, बेसावध शत्रूवर आडवाटेने केलेला हल्ला महत्वपूर्ण ठरतो, याचा अर्थ चोर दरोडेखोर किंवा अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला गनिमी काव्याची उपमा देता येणार नाही. कारण guerrilla म्हणजे गनिमी काव्याचे सैनिक फितूर नसतात तर partisans म्हणजे कट्टरवादी फितूर आणि दिशाहीन असतात. म्हणून सुरा एकच असतो, त्याने काकडी कापली तर ते उपकरण आहे, आणि कोणाचा खून केला तर ते हत्यार होते. हेतु एकच असलातरी फरक भावनेचा असतो. गनिमी काव्याने लढणार्या सैनिकांना कधी जिवाची पर्वा नव्हती. म्हणून म्हणावेसे वाटते, “ ढाल तुटलीतरी, चाल थांबली नाही, सडा पडलातरी, लढा थांबला नाही, मान तुटलीतरी ईमान गेले नाही. त्यानुसार शिवरायासाठी वापरलेली “ पहाड का चुहा “ ही उपाधी कशी फोल ठरते हे कळते.
हो ची मिन्ह म्हणजे सुरुंग का चुहा ( Tunnel rat )
अग्निय आशियात व्हियटनाम नावाचा देश असून 8.5 कोटी लोकसंख्या असणारा हा छोटा देश म्हणजे समुद्र किनार्यावर सापासारखा लांबट पसरलेला आहे. आठव्या शतकापर्यंत येथे चंप नामक हिंदू संकृती होती. पुढे थोर स्वातंत्र्य सेनानी हो ची मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली 1945 ला फ्रेंचापासून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर देशात दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग पडले. दक्षिणेकडील भाग साम्यवादी तर उत्तर भागात कम्युनिस्ट विचाराने दोन भाग पडले. यावेळी दुसरे महायुद्ध नुकतेच संपलेले होते. त्यातून जगाचे भांडवलशाही आणि कम्युनिस्ट असे दोन गट पडले. दक्षिण भागाला अमेरिकेने पाठिंबा दिला तर उत्तर भागाला सोवियत यूनियनने पाठिंबा दर्शविला. त्यामुळे व्हियटनाममध्ये दक्षिण आणि उत्तर याप्रमाणे जोरदार संघर्ष सुरू झाला. “ व्हीयट काँग” नावाची संघटना तयार करून यातिल कम्युनिस्टाचे नेतृत्व हो ची मिन्ह यांनी केले. त्यामुळे 1955 साली अमेरिकेने प्रत्यक्षपणे आपले सैन्य पाठवून कम्युनिस्टाशी युद्ध पुकारले.
कुठं अमेरिका आणी कुठं व्हियटनाम ! तरीपरंतु व्हीयतनामी हारले नाहीत. त्यांनी आपल्या जंगलाचा वापर करत शत्रूला तोंड देण्यास सुरुवात केली. अमेरिकेने त्यांना चिरडून टाकण्यास सुरुवात केली तेव्हा हो ची मिन्ह च्या सैन्याने जगावेगळी युक्ति वापरली. त्याकरिता tunnel म्हणजे जमिनीखाली भुयारे खोदण्यास सुरुवात केली. किती म्हणाल ? तब्बल 250 किमी. बंर कुठले भुयार कुठे निघेल सांगता येत नव्हते. काही ठिकाणी ही भुयारे तीन मजली असून त्यात दवाखाना, सैन्याच्या छावण्या काढल्या. याची द्वारे कुठेतरी अडचणीच्या ठिकाणी तीही एखादा माणूस कसाबसा जाऊ शकेल येवढीच बनविली.
बेसावध अमेरिकन सैन्यावर अचानक हल्ला करून व्हीयटनामी त्या भुयारात लपून बसायचे. कित्येक वर्ष अमेरिकेला याचा पत्ता लागला नाही. पुढे त्यांनी या भुयारात उतरून त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या वाटेवर भू सुरुंग, तारेचे जाळे यासारखे अडथळे निर्माण केल्याने व्हियटनाम – अमेरिका युद्ध तब्बल 20 वर्षे (1950 - 1975 ) चालले. हो ची मिन्ह यांनी यावेळी गनिमी काव्याकरिता प्राप्त असलेल्या भौगोलिक परिस्थितीचा आधार घेतला. अमेरिकेला हे चांगलेच जड गेले. त्यामुळे हो ची मिन्ह यांना अमिरेकेने Mountain rat म्हणजे “ सुरुंग का चुहा” म्हटले. पूर्वी व्हियटनामची राजधानी सैगोन हे शहर होते. पुढे राजधानी होनई ला हलविली आणि सैगोनचे नामांतर हो ची मिन्ह करण्यात आले. याच परिसरात आजही ते सुरुंग सुस्थितीत पाहायला मिळतात. त्यांना कु ची टनेल म्हटले जाते.
याप्रमाणे आपल्या बलाढ्य शत्रूशी गनिमी काव्याने लढण्याकरिता शिवरायांनी दर्या खोर्याचा आधार घेतला म्हणून त्यांना “ पहाड का चुहा “ तर हो ची मिन्ह यांना त्याप्रमाणेच “ सुरुंग का चुहा” म्हटले आहे. शत्रूंनी त्यांना काय म्हटले हे महत्वाचे नसून त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून आपले कर्तव्य पार पाडले हे महत्वाचे आहे. शत्रूंनी त्यांना चुहा म्हटले असलेतरी तेच खर्याअर्थाने शेर आहेत हे नक्की... Dr. satish Kadam, Osmanabad 9422650044
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.