गावडी दारफळमध्ये सापडलेल्या चौदाव्या शतकातील सतीशीळेमुळे हजारो वर्षाचा इतिहास उलगडणार –
प्रा. डॉ. सतीश कदम
उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ हे ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या मागास गाव म्हणून ओळखले जात असलेतरी नुकतेच येथील खंडोबा मंदिरापुढे शके 1312 सालची एक सतीशिळा सापडल्याने गावचा एक हजार वर्षाचा इतिहास उलगडणार असल्याचे मत महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम यांनी व्यक्त केले आहे.
गावडी दारफळ तसे अलिप्त असणारे गाव म्हणून ओळखले जात जाते. त्यामुळे ते कधी प्रकाशात आलेले नाही. गावात खंडोबा मंदिराच्या समोर एक सतीशिळा सापडली असून त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. त्या शिळेवर कोपरात दुमडलेला बांगड्या घातलेला हात असून त्यावर शके 1312 प्रमोद संवस्तर लिहिलेले असून इतर अक्षरे वाचण्याचे काम चालू आहे. सतीशीळेवर शिलालेख असून अशाप्रकारचा शिलालेख दुर्मिळ मानला जातो. यावरून तेराव्या चौदाव्या शतकात गावडी दारफळ हे मोठे धार्मिक केंद्र असून खंडोबा मंदिर परिसर हा मंदिराचा समूह असावा कारण मंदिरालगत प्राचीनकालीन गावतळे, एक प्राचीन विहीर तसेच अनेक वीरगळ आढळून येतात.
गावडी दारफळला भक्कम तटबंदी आणि आजही मजबूत असणारी वेस असून गावात असणारे पांढर्या मातीचे बुरूज आणि जुन्या काळातील रथाची चाके गावाच्या प्राचिनत्वाची साक्ष देतात. गावातील बारा बलुतेदाराची वस्तीही त्याला पूरक असून गावडा हा शब्द कोकणाकडे मोठ्या प्रमाणात वापरला जात असून गावडा म्हणजे गाव कारभारी असा त्याचा अर्थ होतो. त्यावरून कोणत्या कारभार्यााचे दारफळ हे सिद्ध होत नसलेतरी सापडलेल्या सतीशिळेवरून गावावर फार मोठे धार्मिक संकट आलेले असताना त्यांना विरोध करताना गावातील अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुति दिलेली आहे, त्यांच्या स्मरणार्थ वीरगळ तर गावच्या मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांची पत्नी सती गेली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ सतीशिला कोरून ठेवलेली आहे. सतीशिलेवरील अक्षरे काही प्रमाणात अस्पष्ट असून तज्ज्ञाकडून लवकरच त्याचे वाचन करून गावच्या इतिहासाला नवा अध्याय जोडणार असल्याचे मतही डॉ. सतीश कदम यांनी व्यक्त केले आहे.
कोट : गावडी दारफळ हे माझे जन्मगाव असून गेल्या अनेक वर्षापासून इतिहासात संशोधन करून कित्येक गावाला नवा इतिहास दिला. मात्र माझ्याच गावाला प्राचीन इतिहास नसावा याची खंत होती. मात्र या सतीशीळेने गावडी दारफळला वैभवशाली इतिहास असून गावच्या रक्षणासाठी दारफळच्या वीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे. अशा गावडी दारफळचा सार्थ अभिमान वाटतो.
प्रा. डॉ. सतीश कदम अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, 9422650044
*सतीशिळेवर शिलालेख असून अशा प्रकारचा शिलालेख दुर्मिळ मानला जातो. यावरून तेराव्या - चौदाव्या शतकात गावडी दारफळ हे मोठे धार्मिक केंद्र असून, खंडोबा मंदिर परिसर हा मंदिरांचा समूह असावे.*
https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/fourteenth-century-satishila-found-gawdi-darfal-north-solapur?amp
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.