तुळजाभवानी
( व्यासपीठावर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, डॉ . जयसिंगराव पवार, संभाजी भोसले , पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे आदि )
हजारो वर्षाची परंपरा असलेल्या तुळजाभवानीच्या काही वेगळ्या प्रथा परंपरा आहेत.
1. नवरात्र झाल्यानंतर देवीचे सिमोलंघन झाले कि देवीचा पलंग आणि पालखी मोडून ती होमात
टाकली जाते. कारण वर्षभर ती अन्य मार्गाने अपवित्र होऊ नये म्हणून दरवर्षी नवीन पलंग
आणि पालखी आणली जाते.
2. नवरात्रात जालना जिल्यातील रांजणी गावाचा एक भुते नावाचा भक्त तुळजापुरात आल्यानंतर
वेशीपासून देविपर्यंत बोंबलत दर्शनासाठी जात असतो आणि हि पद्धत हजारो वर्षापासून चालू
आहे.
3. तुळजापुरात पहिल्यापासून तेलाचा घाना चालविला जात नाही . कोष्ट्याचा माग नाही.
4. उन्हाळ्यात चार महिने पलंगे नावाचे सेवेकरी देवीला सतत चार तास पंख्याने वारा घालत
असतात .तर याचवेळी भिसे आणि दिक्षित यांच्यावतीने रोज शरबत दिले जाते.
5. येथील लोकांची अशी भावना आहे कि, तुळजापुरात पाल चुकचुकत नाही, अंतविधीनंतर
माणसाचे दहन केल्यानंतर त्याची कवटी फुटत नाही.
6. देवीचे भोपे पुजारी कदम घराणे अस्सल मराठा समाजाचे असलेतरी त्यांच्या मृत्युनंतर त्यांना
पुरले जाते ( दफन ). मराठा समाज्यात अशी प्रथा कुठेच नाही.
7. वर्षातून तीनवेळा मूर्ती झोप घेण्यासाठी एका जागेतून दुसरीकडे उचलली जाते. अशाप्रकारची
चलाचल मूर्ती दुसरी कोणतीही नाही.
8. तुळजापुरातील गरीबनाथाच्या मठातील महंताना वर्ष्यातून फक्त एकदाच देवीच्या दर्शनाला
येण्याचा मान आहे. वैशाख अमावषाला ते मंदिरात येऊन देवीची पूजा करतात, त्यावेळी
त्यांच्याकडून देवीला पांढरे वस्त्र नेसवले जाते.
9. जगाला भरपूर देनार्या देवीला पहिला नैवेद्य हा उपरकर नावाच्या गरीब भक्ताचा आणि तोही भाजी
भाकरीचा असतो. त्यानंतर काही द्या.
10. देवीला पानाचा विडा किंवा डोक्यावर पानाची चुंबळ करण्याकरिता जे पान लागते ते पुरवण्याचे
काम तांबोळी नावाचा मुस्लीम करत असतो .
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.