शिवराज्याभिषेक दिन
साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांनी मराठी जनतेला पुन्हा एकदा स्वराज्याचे स्वप्न दाखविले .
तीस वर्षाच्या अथक प्रयत्नातून राजांनी पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याची गुडी उभा केली. 6 जून 1674 ला
आपला राजा शिवाजी छत्रपती झाला. हि गोष्ट आज वाटते तेवढी सोपी नव्हती. संपूर्ण जगाने याची दखल
घेतली. सभासदाने याचे आपल्या बखरीत छान वर्णन केले आहे - '' एव्हढा मऱ्हाठा राजा छत्रपती झाला हि
गोष्ट सामान्य झाली नाही''.
औरंगजेब त्यावेळी वायव्य प्रांतात होता. त्याला ज्यावेळी हि बातमी समजली, त्यावेळी त्याने आपली
पगडी जमिनीवर काढून टाकली आणि तो त्यावर पाय रगडीतच म्हणाला , आता हद्द झाली, एरव्ही एका
कोपऱ्यात फडफडणारा हा पक्षी आता हवेत भरारी घ्यायला लागला आहे, याला काय म्हणावे?
इंग्रजानीही पुढील धोका ओळखून आपला वकील हेन्री ऑक्क्षिडेन मुद्दामहून या सोहळ्याला पाठविला
होता. त्याने या सोहळ्याचे फारच सुरेख वर्णन केले आहे. तो सोहळयाकरिता राजांनी एक करोड खर्च केल्याचे
म्हणतो आहे. सतत आठ दिवस हा सोहळा चालला. आलेल्या प्रत्येक माणसाला त्याच्या कुवतीप्रमाणे 1 ते 3
रुपये आहेर म्हणून देण्यात आले. लाखोनि या सोहळ्याचा आनंद घेतला . शिवरायांनी छत्रपती हि पदवी
घेतली. आपली स्वतंत्र कालगणना चालू केली, स्वतंत्र चलन काढले, अष्टप्रधानाची नेमणूक करून रयतेच्या
राज्यकारभारास सुरुवात केली . सारया जगाणे हा आनंदाचा क्षण डोळ्यात साठविला .
याला आता 388 वर्ष पूर्ण झाली .आपणाला याविषयी किती देणे घेणे आहे? अलीकडे किमान
कार्यक्रमाला गर्दी वाढायला लागली आहे. त्यातही काहीजण पर्यटन म्हणून येतात . माझ्या राज्याचे दर्शन
घ्यावे हि भावना मनात असली पाहिजे . जो रायगडावर जाणार नाही त्याला स्वर्गात जागा नाही . अधून मधून
रायगडावर जावे . राज्यांच्या चरणापाशी थोडावेळ नतमस्तक व्हावे . बस आणखी काही नको. हि भावना
मनामध्ये बाळगा . मग बघा मनात कशी उर्जा निर्माण होते ती . आपली प्रतिक्रिया सांगत चला , बरे वाटेल.
डॉ . सतीश कदम, satishkadam28@gmail.com
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.