तुळजापुरात मराठा कालखंडावर होणार राष्ट्रीय परिषद
विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली आणि यशवंतराव चव्हाण कॉलेज, तुळजापूर यांच्यावतीने डिसेंबर
महिन्यात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून याकरिता इतिहासकार संशोधकांनी आपले शोध निबंध लवकरात लवकर पाठवावेत असे आवाहन संयोजक डॉ. सतीश कदम यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत असे कि, आपापल्या भागातील नवीन माहिती संशोधनाच्या माद्यमातून पुढे यावी आणि याच सोबत संशोधकांना वाव मिळावा, याकरिता विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्यावतीने महाविद्यालयांना अनुदान देऊन परिषदेचे आयोजन करत असते. त्यानुसार तुळजापुरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने प्रस्ताव पाठउन देऊन तसा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी ' मराठ्यांच्या इतिहासातील नवीन संदर्भ' हा विषय ठेवण्यात आलेला असून याकरिता संशोधकांनी आपले शोधनिबंध लवकरात लवकर कदम यांच्याकडे पाठवावेत असे आवाहन प्राचार्य मोहिते यांनी केले आहे. शोधनिबंधाचे पुस्तक काढण्यात येणार असून आपले शोधनिबंध satishkadam28@gmail.com
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.