हकीकत
नुकतीच तुळजापूरची यात्रा संपन्न झाली, देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्त रोजच येत असत. यामध्ये मुलबाळ अबालवृद्ध असे सर्वचजण सामील झाले होते. आता सर्वत्र पक्के रस्ते तयार झाले असलेतरी पायी चालत येणारे लोक अजूनही जुन्याच रस्त्यावरून चालत येतात. असे रस्ते फारच आडवळणाचे दर्या खोऱ्यातून जातात. अक्कलकोटवरून येणारा असाच एक रस्ता तुळजापूरच्या आमच्या कॉलेजच्या जवळून जातो, विशेष म्हणजे कॉलेजच्या बाजूला मोठी दरी आहे आणि जंगल असून त्यातूनच हा रस्ता पास होतो.
रोजच्या प्रमाणे आम्ही बसलो असताना कुणीतरी बातमी आणली कि दरीतल्या रस्त्यावर कोणीतरी बेशुद्ध पडलेले आहे. येणारे जाणारे फक्त बघून जात होते, फारच दयाळू असणाऱ्यांनी त्याच्या बाजूला भाकरी टाकून दिली, याचा उलट परिणाम झाला. त्यामुळे मुंग्या लागल्या. कारण आम्ही ज्यावेळी तिथ पोहोचलो तर तो ८० वर्षाचा माणूस होता. डोळ्याने नीट दिसत नाही, तरीपण बहाद्दर देवीच्या दर्शनाला आले. अचानक चक्कर येऊन दरीत पडले. दोन दिवस तिथच पडलेले होते. लघवीने कपडे घाण झालेले तर कपड्यात कुशळ घुसलेली होती. सर्व साफसफाई करून आम्ही त्यांना अगोदर दरीतून बाहेर काढले. थोडेसे उपचार केल्यानंतर त्यांना शुद्ध आली. आणि अंगात त्राण आल्यानंतर त्यांना पत्ता विचारला . पत्ता सांगितला परंतु तिकडे जायचे नाही, म्हणून सांगितले. यावरून बरेच काही समजू शकते. तरीपण त्यांना घरापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते ( घरी कोणीही वाट बघत नसलेतरी). त्यानुसार आपणाला शक्य तेवढे केले. यावेळी माझ्यासोबत डॉ. अशोक मर्दे , हनुमंत चव्हाण, अशापक खोडील, उद्धव ननावरे हे होते.
डॉ.सतीश कदम , तुळजापूर.
1 टिप्पण्या
good
उत्तर द्याहटवाpls tell me what your mind.