सोलापूर जिल्ह्यातील शिवरायांच्या पाऊलखुणा

                            

  सोलापूर जिल्ह्यातील  शिवरायांच्या पाऊलखुणा 


१ . जिंती 
         
      निझाम काळापासून जिंती हे गाव भोसल्याकडे होते. त्यामुळे जिंती गावात बाबाजी, मालोजी, शहाजी, जिजाबाई व त्यांच्यासोबत शिवाजी महाराज राहीले. पुढे  जिजबाईच्या नातसून माकुबाई यांचा वावर शेवट पर्यंत होता . याच घराण्यातील काकासाहेब भोसले जिंती करांनी शिवरायांची उत्तरक्रिया पार पाडली . 

२. पानगाव 
  
         या गावातील माणको पंताची ८ मुले शिव रायांच्या फौजेत होती . तर वैरागच्या निंबाळकर घराण्यातील  अंबिकाबाई या राजारामाच्या रूपाने महाराजांच्या सून होत. वैरागने निम्बाजी, मकरंद, हनमंत राव असे तीन सेनापती स्वराज्याला दिले.  सातार च्या गादी चे वारस दुसरे शिवाजी यांना याच घरण्या तील कमळज्याबाई दिलेल्या होत्या . तर वैरागच्या दर्याबायीनी स्वराज्याचा छत्रपती रामराजेला ५ वर्षे पानगावात वाढविले होते. 

३.    धामनगाव 

          बार्शी तालुक्यातील बोधालेबाबा हे एक असे संत होऊन गेले कि, त्यांना छत्रपति शिवराय आणि औरंगजेब अश्या दोघांनी पूजले आहे. त्यामुळे ते राजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असावेत. 

४.  मालशिरस तालुक्यातील मांडकी येथे शिवरायांनी आपले थोरले बंधू संभाजी यांच्या स्मरणार्थ संभा पूर नावाची पेठ वसविली होति. तर राज्यांच्या कन्या सखुबाई यांचे स्मारक माळशिरस गावात आहे , 

५.  मंगळवेढा 

         १ ८  नोव्हेंबर १ ६ ६ ५ ला शिवरायांचा मुक्काम मंगळवेढ्यात आहे. मिर्झा राजे जयसिंगा सोबत ते मंगळवेढ्याच्या किल्ल्यात मुक्कामाला आहेत. 

. ब्रम्हपुरी 
                   येथे औरंगजेबाचा मुक्काम १ ६ ९ ९  ते १ ७ ० ५ असा असून यादरम्यान त्यांच्या कै देत राज्यांच्या धर्म पत्नी सकवारबाई आणि सून येसू बाई बाळ शाहूसह राहिल्या आहेत . 

डॉ . सतीश कदम, इतिहास संशोधक 
satishkadam28@gmail.com

              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या