काठमांडूतल्या भैरवाला बीअरचा नैवेद्य
आपण कुठल्याही देवीला गेलोतर बाहेरच्या बाजूला दगडाला शेंदूर लावलेला एक देव पाहत असतो. आपणाला तो काय आहे हे माहित नसते. परंतु तो भैरव असतो. ज्यावेळी देविजींचे आगमन झाले, त्याचवेळी त्यांच्या व्यवस्थेकरिता अष्ट भैरवाची निर्मिती झाली. प्रत्येक देवी मंदिराच्या बाहेर भैरव हा असतोच. तुळजापूरला काळ भैरव , टोळ भैरवसह अष्ट भैरव आहेत. विशेष म्हणजे तुळजापूरातील काळ भैरवाला नेवैद्यात गांजाची चिलीम दिली जाते.
त्यानुसार नेपाळमधील तुळजाभवानी मंदिराबाहेर २० फुट उंचीचा भैरव असून त्याच्यापुढे रोजच बलिदान चालू असते. शिवाय त्याला नेवैध दिल्यानंतर बीअर दिली जाते. याचे आपणाला आश्यचर्य वाटत असलेतरी भैरव हि माणसाच्या मनातील एक प्रवृत्ती असून त्याला दिलेला नेवैध्य हे त्याचे रूप आहे . मन नियंत्रण करण्याचा तो एक संदेश आहे .
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.