जिजाऊ मासाहेबांची आसन ( पाचाड )
रायगड बांधून झाला, स्वराज्याची राजधानी तयार झाली , गडांचा राजा रायगड फक्त मा साहेबांच्या नशिबी नसावा , जिथं आपला पोर शिवबा राजा म्हणून बसणार त्या गडाच रूपच न्यार, समुद्र सपाटीपासून गडाची उंची जास्त असल्याने जिजाऊना वरचे वातावरण मानवत नव्हते. याकरिता राजांनी आईसाहेबाकरिता गडाखाली पाचाडला स्वतंत्र वाडा बांधला.
आई साहेबांच्या वाड्याला १७ बुरुज होते, पाण्याकरिता २६ पायऱ्याचा बारव होता. या बारवावर वरच्या बाजूला खास दगडी लोड तयार करून घेतलेला होता. याच लोडवर मा जिजाऊ सकाळच्या वेळी बसून पाण्याला येणारांची आस्थेने चौकशी करत असत. आपल्या मुलाच्या कारभाराविषयी जनतेचा कानोसा घेत असत. आज पाचाडचा वाडा पडला. परंतु मा साहेबांची बैठक कायम आहे. कदाचित आपणाला ती बैठक सांगतेय माझ्या विचारावर चला. जय जिजाऊ !!!
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.