ANDMAN NIKOBAR

अंदमानातील जारवा गोरे मूल मारून टाकतात
 · 
मलाया भाषेत हनुमानाला हंडूमान  म्हणतात. हंडुमानपासून अंदमान नाव पडले.  तर नग्न लोकांची वस्ती म्हणजे नेक्कावरम या शब्दावरून  निकोबार शब्द आला. बंगालच्या उपसागरात जगापासून दूर ५७६ बेटांचा एक समुह असुन पैकी २६ बेटावर अंदमान तर १० बेटावर निकोबार आहे. अशा  ३६ बेटावर मानवी वस्ती असणाऱ्या या भुभागाला अंदमान निकोबार म्हटले जात असलेतरी निकोबार हे अंदमानपासून  २८० किमी अंतरावरील स्वतंत्र बेट असुन निकोबार बेटावर जाण्यास आता पर्यटकांना पूर्णपणे बंदी आहे. प्राचीन काळापासून येथील बेटावर ओंगी, जारवा, शोंपिंग,सेंटिनल, ग्रेट अंदमानी आणि निकोबारी या सहा आदिवासी जमाती राहतात. अंदमान निकोबार हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश असून त्याचे प्रशासन  उप राज्यपालांच्या अखत्यारीत आहे. याचे क्षेत्रफळ ८२९३ चौरस मैल इतके असून ते दक्षिण अंदमान उत्तर अंदमान ( मायाबंदर) आणि निकोबार अशा तीन जिल्ह्यातील ५६० गावात विभाजित केलेले आहे.  रामायण काळात लंकेला जाण्यासाठी रामाणी याच बेटावरून सेतू बांधण्याचा अयशस्वी पर्यंत केल्याचे स्थानिक लोक सांगतात. या बेटावरून लंका, इंडोनेशिया इत्यादी बेटावर जाण्याचा मार्ग असल्याने याला प्राचीनकाळी फार महत्व होते. ई.स. १०५० मधील तंजावर येथील एका शिलालेखात नेक्कावरम  हा शब्द आलेला आहे. पुढे दुसऱ्या शतकात टॉलेमी, सातव्या शतकात इस्तीग, चौदाव्या शतकातील मार्कोपोलो तसेच चौदाव्या शतकातील फ्रायर ओडोरीक आदींच्या प्रवास वर्णनात या बेटांचा उल्लेख आलेला आहे.  या बेटावर प्रथम पोर्तुगीज आणि फ्रेंचांनी काही दिवस आपले वर्चस्व निर्माण केले परंतु येथील प्रतिकूल वातावरणामुळे ते फारकाळ थांबले नाहीत. 
 पुढे येथील आदिवासी चाचानी जहाजे लुटण्यास सुरुवात केली. भारतासह जगावर इंग्रजांचे राज्य सुरु झाले तेव्हा इ.स. 1789 ला येथील आदिवासींवर विजय मिळवत एक पहिली मानवी वस्ती निर्माण करणारा इंग्रज अधिकारी अर्चिबिल्ड  ब्लेअर या अधिकाऱ्याच्या नावावरुन राजधानीला नाव पडले पोर्ट ब्लेअर..अगदी सुरुवातीला अंदमानचे मुख्यालय इंग्रजांनी रॉस आयलंडवर ठेवलेले होते. येथील पेडॉकसारख्या १३० फूट लांब आणि ५-६ फूट रुंद वृक्षाच्या  लाकडामुळे इंग्रजांनी अंदमानवर आपले लक्ष वळवले. त्यातून एक एक बेट सुधारत गेले. त्यामुळे आजही अंडमानमधील बेटांना रॉस, हॅवलॉक, निल अशी इंग्रज अधिकाऱ्यांची नावे आहेत.
 वस्ती वाढविण्यासाठी इंग्रजांनी गंभिर गुन्हे गारांना येथे पाठविले. त्यातून एक मिश्र समाज तयार झाला. सोबत भव्य अशी जेल बांधून भारतातील विविध कैद्यांना येथे ठेवले जायचे. तेथील क्रुर अत्याचारामुळे याला काळ्या पाण्याची शिक्षा म्हटले गेले. काळे पाणीचा अर्थ -  काल म्हणजे अंतिम वेळ. यानुसार काळापाणी म्हणजे अंतिम वेळी शेवटचे दिले जाणारे पाणी. या जेलमधील कैद्यांकडून इंग्रजांनी अनेक कामे करत तेथे सुधारणा घडवून आणल्या. dr. satish kadam
  पुढे बंगाल,तामिळ, आंध्र अशा अनेक भागातून लोक याठिकाणी येऊन राहू लागले त्यातूनच अंदमान मध्ये एक मिश्र समाज तयार झाला. मराठा समाजही तेथे मोठ्या प्रमाणावर असून त्यांची संख्या जवळपास २५०० इतकी आहे. यासाठी तेथे स्वतंत्र महाराष्ट्र मंडळहि बांधलेले आहे. आज पर्यटनासाठी अंदमानसारखे दुसरे ठिकाण नाही. नीळा समुद्र त्यात ४० फुटावर दिसणारा तळ, रंगीबेरंगी मासे, कोरल, समुद्री वनस्पती, जगातील सर्वात मोठा कासव ( डामोचिलिया कोरोसी ), सर्वात मोठा ३.३ फुटाचा खेकडा येथेच आढळतो. ८७% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला असल्याने घनदाट जंगल असल्याने समुद्र किनारा असूनही गरम होत नाही. त्यामुळे जून ते सप्टेंबर सोडून आपण कधीपण अंदमानला जाऊ शकतो. येथे व्यावसायिक मच्छीमारीला बंदी असून शून्य टक्के प्रदूषण असल्याने बंदरावरील पाणी अतिशय निर्मळ असून राधानगरी बीच हे आशियातील सर्वात सुंदर बीच मानले जाते. नॉर्थ बे, रॉस, ह्यॅवलॉक, निल, स्मिथ, बाराटांग हि बेटे पाहण्यासारखी आहेत. तसेच इंग्रजांनी चालू केलेली अवाढव्य अशी अशी लाकडाची मिल जरूर पाहावी अशीच आहे.. 
गोरे मूल मारून टाकणारा अंदमानातील आदिवासी  जारवा ..... 
 प्राचीन काळापासून येथील बेटावर ओंगी, जारवा, शोंपिंग,सेंटिनल, ग्रेट अंदमानी आणि निकोबारी या सहा आदिवासी जमाती राहतात. पैकी जारवा हि जमात हि मूळची आफ्रिकन वंशीय असून अंदमानवर त्यांचे वास्तव्य हे ५००० वर्ष्यापेक्षा जास्त असल्याचे मानले जाते. कालौघात या जमातीचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून १९११ च्या गणतीनुसार ओंगी १००, जारवा ५००, शोंपिंग २००,सेंटिनल उपलब्ध नाही , ग्रेट अंदमानी ४५ आणि निकोबारी ३०,००० एवढी राहिलेली आहे. पैकी जारवा ही जमात सर्वात चर्चेला आलेली जमात असून दक्षिण अंदमानात यांचे वास्तव्य असून अजूनही हे लोक पाषाण युगात वावरतात. त्यामुळे पूर्णपणे नग्न अवस्थेत राहून नारळपाणी, खेकडे, मासे, मध आणि डुकराचे मांस खाऊन गुजराण करतात. जारवा हीच त्यांची बोली भाषा असून त्यांना भारताचे कायदे लागू नाहीत, १९९० पर्यंत त्यांचा मानवी वस्तीशी फारकाही सम्पर्क आलेला नव्हता. त्यानंतर पोर्ट ब्लेअर ते दिगलीपूरला जाणारा अंदमान ट्रंक रोड बनविताना जारवानी रस्त्यावर येऊन बाणांनी लोकांस मारन्यास सुरुवात केली तेव्हा याना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले मात्र आपले अन्न पाणी त्यांना मानवत नसल्याने ते विविध रोगाला बळी पडू लागले. एक जखमी झालेला मुलगा बरेच दिवस दवाखान्यात राहिल्याने त्यांनी हिंदी भाषा अवगत केली. त्यामुळे जारवा आता काही प्रमाणात जवळ येताना दिसतोय. तरीपण त्यांचे कायदे कानून वेगळेच आहेत. एकपत्नित्व हि पद्धत आजही जपली जाते, संख्या कमी असलीतरी ते आपापल्या टोळीनेच जंगलात राहतात. लहान मुलाला कुठलीही माता दूध पाजवते. जोडीदाराशिवाय इतर कुठलाही पुरुष परक्या स्त्रीकडे पाहू शकत नाही. एखादी स्त्री विधवा झाली तर तिचे मूळ मारून टाकले जाते. आणि जारवात येथील बायकांना सर्वात मोठे टेन्शन म्हणजे गोरे मूल जन्माला येणे आहे. कारण जारवा हा मूळचा आफ्रिकन वंशाचा असल्याने जाड काळीभोर त्वचा आणि बसके नाक तसेच मोठे पण तजेलदार डोळे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणि यात चुकून फरक पडला आणि गोरे मूल झाले तर ते दुसऱ्या वंशाचे समजून ते मारून टाकले जाते. काळे मूल जन्माला यावे  यासाठी गर्भवतीला प्राण्याचे रक्तही पाजले जाते. अंदमानहून बाराटंग ला निघाला कि जराटांग या चेक पोस्ट वर पास घेऊनच पुढे मिलिटरीच्या गाड्या मागेपुढे ठेवतच इथला प्रवास करविला जातो. रस्त्याने जाताना जारवाची एखादी टोळी हमखास दिसतेच. काही मूर्खांनी त्यांना पान तंबाखू देऊन व्यसन लावल्याने ते मोठमोठ्याने पण मागत असतात. त्यांचे फोटो काढणे किंवा खायला देणे बन्धनकारक असलेतरी अति शहाणे देतातच. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. आता काही प्रमाणात ते कपडे घालतात परंतु ते साफ करणे त्यांना माहित नसल्याने आणखी नवीन रोगाला ते बळी पडत आहेत. काही असो अंदमानात जाऊन जारवा पाहणे खरंच अतिशय वेगळा अनुभव आहे....  pls dont copy without name.
south Andman
Jarvah
Jiratang check post


 
 dr. satish kadam, osmanabad 9422650044

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या