मराठ्यांनी ओडिशावर 60 वर्ष राज्य केले..

मराठ्यांनी ओडिशावर 60 वर्ष राज्य केले..


मराठ्यांची सत्ता अटकपासून कटकपर्यंत होती. असे आपण नेहमीच वाचतो. परंतु ही ठिकाणे नेमकी कुठं आहेत, यावर आपण विशेष लक्ष देत नसतो. त्यातच 1760 ला मराठे पानिपतावर हरल्यानंतर आपण जास्तच आत्मकेंद्री झालो. मराठा पानिपतावर हरला त्यामुळे सर्वत्र भीतीमय वातावरण निर्माण झाले. आजही तो पानिपताच्या या महाभयंकर विनाशाला विसरू शकत नाही. परंतु याचवेळी नागपूरच्या भोसलेंनी बंगाल प्रांतावर मुगलासह इंग्रजांवर दहशत बसवली होती.
19 एप्रिल 1742 छ्त्रपती शाहूच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांचे सेनापति श्रीमंत रघुजी भोसले नागपूरकर यांनी आपला एक सेवक भास्करराव पंडित याला बंगालच्या स्वारीवर पाठवून कटकचा किल्ला बारबती त्याब्यात घेतला. यावेळी बंगालवर मुघलांचा सुभेदार अलिवर्दीखान हा कारभार करत होता. 1742 ते 1751 अशी आठ नऊ वर्षे मराठा फौजानी बंगालवर प्रचंड दहशत माजविली. तेथील राजे महाराजे, जमीनदार आणि सर्वसामान्य जनतेत मराठ्यांच्या आगमनाची भीती निर्माण झाली होती. आजही त्या परिसरात लोकगीतातून व्यक्त होताना दिसून येते. 

“ छेला घुमालो | पाडा झुलालो |
बोर्गी अलो देशो | बुलबुलतेने धान खायछो |
खजाना देबो कीशे || ”

पुढे आलीवर्दीखानाचा पराभव करून भोसल्यांनी 1751 साली तत्कालीन बंगाल प्रांतातील ओरिसा प्रांत पुर्णपणे जिंकून घेतला. आणि तेथील व्यवस्थेकरिता स्वतंत्रपणे एका सुभेदाराची नेमणूक केली. त्यानुसार 1751 ते 1803 अशी जवळपास पन्नास एक वर्ष ओडिशावर मराठ्यांची सत्ता होती. यादरम्यान 9 सुभेदारांनी आपला कारभार केला. 

1. मिर हबिब -1751 ते 1752 

2. मिर्झा सालेह -1752 ते 1759
  3.शिवभट्ट साठे  -1760  ते 1764
    4. भवाणी पंडित -1764  ते 1768 
      5. संभाजी गणेश  -1768  ते 1770 
     6. बाबूजी नाईक  -1771  ते 1773 
   7. महादजी हरी -1773  ते 1777 
      8. राजाराम पंडित -1778  ते 1793 
9. सदाशिवराव- 1793  ते 1803 

मध्ययुगात ओडिशा हा बंगालचाच एक भाग असून कलकत्ता ही त्याची राजधानी होती. याचठिकानी इंग्रजांनीही आपली वखार निर्माण केलेली होती. आपल्याला मराठ्यांचा त्रास होऊ नये म्हणून इंग्रजांनी आपल्या वखारीभोवती भली मोठी चर खोदून घेतली होती. आजही कोलकत्ता येथे गेलो तर त्या भागाला Maratha ditch म्हटले जाते. मराठ्यांना ओडिशा प्रांतपुढे जाता आले नाही परंतु आजचा संपूर्ण ओडिशा ( 30 जिल्हे) हा तब्बल पन्नास वर्ष आपल्या ताब्यात होता म्हटल्यानंतर आपली मन गर्वाने ताठ झाल्याशिवाय राहत नाही. या संपूर्ण प्रदेशाची व्यवस्था लावण्याकरिता भोसल्यांनी ओडिशाची दोन भागात प्रशासकीय विभागणी केली.

1. मुगलबंदी 2. गडजात
आणि यावर एका सुभेदाराची ( अमिलची ) नेमणूक करून त्याच्या हाताखाली गाव पातळीपर्यंत एक छान अशी यंत्रणा उभी केली. केवळ मुगलबंदी भागातच 150 परगणे होते. महसुलाच्या वसुलीकरिता चौधरी, कानूनगो अशी रचना केली. यातून मराठ्यांना जवळपास 12 लाखाचा महसूल मिळत होता. 
16 व्या शतकात खिलजीच्या आक्रमनापासून पूर्वेकडील काशी मानलेल्या पुरी येथील हिंदूंच्या जगन्नाथ मंदिराच्या पूजेत बरीच मरगळ आलेली होती. याकरिता भोसल्यांनी बाबा ब्रम्हचारी गोसावी यांची महंत म्हणून नेमणूक केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुरीच्या जगन्नाथ मंदिरापुढे दिसणारा 34 फुट उंचीचा आणि सोळा कोणी असणारा “ अरुण स्तंभ ” तेथून जवळच असणार्‍या कोणार्क येथून आणून महाद्वारापासून 25 फुटावर बसविण्यात आला. 40 लाख रुपये खर्चून भास्कर पंडिताच्या नेतृत्वाखाली भोग मंडपाची उभारणी करण्यात आली. पुजार्‍यांना दानपत्र देऊन पूजेची व्यवस्था केली. तसेच भविकासाठी अन्नछत्र उघडण्यात आली. 
दुरून येणार्‍या भाविकांची सोय व्हावी म्हणून कटक ते कलकत्ता, नागपुर, जयपूर , मद्रास, विशाखा पट्टणम अशा रस्त्याची उभारणी केली. त्यावर गरजेनुसार पूल बांधले. या पूलावरून शहरात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेतील असलाततर 8 आणे आणि बंगालकडून आलात तर 10 आणे कर भरावा लगायचा. तर बैलगाडीकरिता 9 आणे कर आकारला जात होता. आजही आपण पुरी त प्रवेश करताना जो 280 फुटाचा पूल लागतो त्याला “अठरानाल पूल” म्हणतात तो मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो. पुरी परिसरात जवळपास 22 धर्मशाला बांधल्या. अनेक मठांना दानपत्रे देण्यात आली. ओडिशातील प्रशासकीय यंत्रणा अतिशय चोख असून गरज पडल्यास भोसल्यांनी तेथील सुभेदारांना कडक शासन केल्याचे दिसून येते. कटकचा किल्ल्यावरून शासन चालविताना त्यांनी या भागात एका गणेश मंदिराची उभारणी केली, तसेच भाविकांना थांबण्यासाठी एका मठाची निर्मिती केली. 
कटक चा किल्ला मराठा फौजेला कमी पडायला लागला तेव्हा 1775 साली सुभेदार राजाराम पंडिताच्या नेतृत्वाखाली एका स्वतंत्र लष्करी तळाची उभारणी केली. त्याला पुढे मराठा बराक्स ( Maratha बररक्क्स) नाव पडले. जंगल परिसर साफ करून अतिशय मेहनत घेऊन मराठ्यांनी याची उभारणी केली. या बराक्समध्ये मराठ्याचे 2000 मराठे सैनिक यामध्ये रहात होते. 1803 नंतर ओरिसा इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर इंग्रजांनीही याठिकाणी मुक्काम केला. आजही या बराक्स अतिशय सुस्थितीत असून 40x 30 फुट आकाराच्या जवळपास 70 खोल्या असून त्यात आज ओडिशा राज्याची राज्य राखीव दलाची 6 बटालियन यात राहते. प्रत्यक्षात आताही या परिसराला मराठा बराक्स हेच नाव असून तेथील लाइट बिलावर तशी नोंद आहे. 
(प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044 )
उत्तरेकडचा इतिहास पहात असताना आपण आपला वैभवशाली इतिहास कसा विसरलो याचे आश्चर्य वाटते. ओडिशा मात्र आपणाला विसरू शकत नाही, रात्री बेरात्री गनिमी काव्याने हल्ला करणार्‍या मराठ्यांना ते “ बोर्गी ” म्हणत. हा बारगीरच अपभ्रंश आहे. अशा बोर्गीचा इतिहास ओडिशातील एमए इतिहास विभागाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. 1757 प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल प्रांतावर ताबा मिळविला असलातरी मराठ्यांनी आपली सत्ता कायम ठेवली. शेवटी देवगावच्या तहानुसार 1803 साली मराठ्यांनी ओडिशा प्रांत इंग्रजांना बहाल केला. या दरम्यान नागपूरच्या भोसले घराण्यातील राघोजी, जानोजी व दुसरे रघोजी यांनी महत्वपूर्ण भूमिका निभाऊंन मराठ्यांच्या झेंडा कटकेपार नेला. मराठ्यांच्या भीतीने त्याकाळी आई आपल्या मुलांना म्हणायची “ सो जा बेटा नाही तो बोर्गी आ जाएगा.” अशा या पराक्रमी वीरांना त्यांच्याच भूमीतून मी नतमस्तक होतो. ( लेखकाचे नाव टाळून कॉपी करू नये. ) 
प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044


Image may contain: 2 people, including Satish Kadam, people standing and outdoor

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या