39 बायका आणि 94 मुलांचा बाप असलेला मिझोरमचा दादला
सध्या भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दररोज त्यात हजारो मुलांची भर पडत आहे. हीच अवस्था राहिली तर येणार्या काळात भारताला अनेक नवीन समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे भारत सरकार ‘हम 2 हमारे 2’ ची घोषणा करून लोकसंख्या वाढीवर जनजागृती करत आहे. लोकांचा याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. तरी परंतु पाहिजे त्याप्रमाणात याला आळा बसलेला नाही. गरीबी, धर्म यासारख्या गोष्टीचा यात मोठा अडसर आहे.
मिझोरममधील एका बहाद्दरानेतर भारताच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाला हरताळ फासला आहे. याचे नाव आहे ‘ जियोना चाना’ असून तो मिझोरमची राजधानी आईजोलजवळच्या बटवांग नावाच्या गावात राहतो. 1945 साली जन्मलेला जियोना 74 वर्षाचा असून या महाशयांनी आतापर्यंत एकूण 39 अधिकृत विवाह केलेले आहेत. यातील शेवटचा विवाह 2000 सालचा असून त्या बायकोचे वय नाममात्र 33 वर्ष आहे. एकाच घरात या सर्व 39 बायका अतिशय आनंदाने रहात असून सर्वात थोरली बायको या सर्व बायकांचा कारभार पहाते. 100 खोल्यांचे 4 मजली घर म्हणजे एक अख्खी वस्तीच म्हणावी लागेल. घराचे नावही मोठे दमदार असून त्याला ‘छौन थर रन’म्हणतात. ज्याला इंग्रजीत ‘New Generation Home’ म्हटले जाते. मराठीत आपण याला आधुनिक विचाराचे घर असेही म्हणू शकतो.
तर अशा या आधुनिक विचाराच्या घरात राहणार्या जीयोन्याला 39 बायकापासून 94 मुले झाली असून 14 सुना आणि मुलामुलींचे मिळून 33 नातू आहेत. त्यामुळे घरातील एकून माणसांची संख्या 181 झाली आहे. फर्निचरचा व्यवसाय करणार्या या कुटुंबाकडे थोडीशी जमीनपण आहे.घरातील सर्वजण आपापल्यापरिने कुटुंबासाठी हातभार लावतात. येवढ्या मोठ्या कुटुंबासाठी दररोज 130 किलो अन्न लागते. त्यात 45 किलो तांदूळ, 25 किलो दाळ, 40 कोंबड्या व 50 अंड्याचा समावेश आहे. मटणाच्या दिवशी तब्बल 10 बोकडांचा बेत करावा लागतो. घरातील सर्वमंडळी एकाचवेळी जेवायला बसतात. यासाठी 50 डायनिंग टेबल तयार करून घेतलेले आहेत.
या कुटुंबाचे वैशिष्ट म्हणजे कधीही भांडण करत नाहीत. सर्वजण अतिशय एकोप्याने राहत असून मुलांना खेळण्याकरिता बाहेर जाण्याची गरज पडत नाही. मुलांना शिकण्यासाठी त्यांनी स्वत:ची शाळा काढलेली असून त्याठिकाणी त्यांच्या पत्नी आणि मुली शिक्षकाचे काम करतात. जियोन्याच्या सर्व बायका त्याच्यावर खुश असून त्याला जगातील सर्वात सुंदर पुरुष मानतात. जियोनीचे पहिले लग्न वयाच्या 17 व्या वर्षी झाले. त्यानंतर त्यांना एखादी मुलगी आवडली तर तिच्या कुटुंबाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवत गेले आणि लग्न करत गेले. जियोनी इसाई धर्मातील एका जातीचे असून त्यात बहुपत्नीत्वाला परवानगी आहे.
त्याच्या 22 बायका या अजूनही 40 च्या आतील असल्याने हे कुटुंब आणखी वाढण्याची शक्यता असून जियोनी आणखी एका लग्नाचा विचार करत आहे. अगोदरच 181 सदस्य एकाच कुटुंबात राहण्याचा जागतिक विक्रम करून या पट्ट्याने ‘गिनीज बुकात’ आपले नाव कोरलेले आहे. आता पाहायचे आहे तो आपलेच रेकॉर्ड कधी तोडणार आहे ते. एकमात्र आहे येवढ्या एकगठ्ठा मतदानाचा मालक असल्याने जियोनीला राजकारणी मंडळी चांगलाच भाव देतात. तो एका आदिवाशी जमातीतला असून त्यात बहुपत्नीत्वाला मान्यता आहे. पतीला परमेश्वर मानणार्या भारतीय संस्कृतीमुळे वयाची 75 वी पार करत असतानाही जियोनी अजूनही फिट आहे. एकाच पत्नीला वैतागून तिच्यावर विनोद करणार्या जेंटलमॅनसाठी ‘जियोन्या’ एक वेगळा अध्याय आहे. प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.