आंधळी कोशिंबीर असो कि आयत्या पिठावर रेघा यात पिठाचा संबंध नाही की कोथिंबिरीचा ....
मग ...
असे काही शब्द वाचण्यात आले, ज्याचा लावला जाणारा अर्थ आणि वास्तविक अर्थ यात खूप फरक आहे. अशाच काही वाक्याचा / शब्दाचा आपण येथे अर्थ पाहू या...
१. आयत्या पिठावर रेघा - यामध्ये दळनाच्या पिठाचा आणि म्हणीचा अर्थ वेगळाच आहे. तर त्यानुसार पीठ घेऊन त्यावर रेघा ओढणे हे अभिप्रेत नाही. मग हे आले कोठून... तर पूर्वीच्या काळी प्रमुख अतिथी घरी जेवायला येणार म्हटल्यानंतर त्याची मार्गप्रतिक्षा व्हायची. अतिथीला कुठे बसवायचे हे ठरलेले असायचे, परंतु अचानक गोंधळ नको म्हणून जिथं अतिथीचा पाट ठेवलेला असायचा त्यावर रांगोळीची किंवा पिठाची रेघ मारली जायची. सायास त्या पिठावर बसायचा. साहजिकच विनासायास त्याला आपली जागा मिळायची. खरंतर तो बसल्यामुळे आहे ती रेघ पुसून जायची, परंतु यातून म्हण आली - आयत्या पिठावर रेघा किंवा रेघोट्या . त्यामुळे खाण्याच्या पिठाचा आणि याचा याप्रमाणे आहे.
२. आंधळी कोशिंबीर - यात कोथिंबीर, काकडी, दही वगैरे टाकून केलेला पदार्थ हा अर्थ आजिबात नाही. प्राचीन काळी कौशांबी नावाच्या शहरात " अंधा कौशांबी " नावाचा जो खेळ खेळला जायचा तो खेळ आपल्याकडे आल्यानंतर त्याला ' आंधळी कोशिंबीर ' हे नाव पडले. त्यामुळे खाण्याच्या वस्तूचा यात काही संबंध नाही.
३. जावई शोध - यातही जावई या नात्याने कुठल्याही व्यक्तीचा काहीही संबंध नाही. तर हा शब्द जाअवेअ - जातवेद्न या शब्दापासून तयार झाला असून याचा अर्थ होतो सर्वकाही जाणतो असा आव आणणारा. विपरीत अर्थाने हा शब्द घेतलेला आहे.कमी माहितीच्या आधारे मत व्यक्त करणारा ... त्याच्या अनभिज्ञ उत्तराला जावई शोध हा शब्द रूढ झाला.
४. बट्याबोळ - मूळ शब्द वास्तुकापूल ते वस्त्र + ढीग याप्रमाणे असून वस्त्रांच्या दशांची अव्यवस्था किंवा गुंतागुंत असा त्याचा अर्थ होतो. कापड तयार करत असताना कापसाच्या दश्याची गुंतागुंत होणे, म्हणजेच कामाची बिघाड होणे, त्याअर्थाने हा शब्द घेतलेला आहे. याठिकाणी खरंतर कापसाचा संबंध येतो तोमात्र घेतला जात नाही.
५. गलतान - गलतान म्हणजेच गलस्तानी... अर्थातच गळ्यावर असलेले, परंतु काय ? तर काही शेळीच्या गळ्यावरही एक दोन स्तन असतात. ज्याचा काहीही उपयोग नाही अशाप्रकारचा अवयव, किंवा निरूपयोगी प्राणी असा होत असलातरी बिघालेल्या किंवा अनावश्यक कामाला गलतान कारभार असा शब्द रूढ झाला. वास्तविक पाहता या शब्दात कुठेही शेळीचा अथवा स्तनाचा वापर दिसत नाही.
६. परसांकडे - परसांकडे म्हणजेच परम संकट, आणि दुसरा शब्द परसाकडे - म्हणजेच कुंपणाकडे. या दोन्ही शब्दात सौचास जाणे हा अर्थ कुठेही अभिप्रेत नाही, तरीपण ग्रामीण भागात आजही सौचास जाणे म्हणजेच परसाकडला जाणे हा शब्द सर्रास वापरला जातो. मात्र पूर्वीच्या काळी सौचासाठी जिथे जायचे तो भाग परसाकडे म्हणजेच गावाबाहेर जाणे या अर्थाने घेतलेला असावा.
७. झक मारणे - हा शब्द झग या शब्दापासून आलेला असून झक या शब्दाचा मूळ अर्थ होतो, समर्थ असणे / लढण्यास समर्थ असणे. त्यानुसार तो लढण्यास समर्थ होता परंतु लढाईच झाली नाही. म्हणजेच त्याचे एखाद्या कामासाठी सामर्थ्य व्यर्थ जाणे. त्यापासून झक मारली हा शब्द आला.
अशारितीने अनेक शब्दाचा अर्थ माहित करून घेताना कशाचा अर्थ कशाला लागला हे समजत नाही उदा. फक्कड - असभ्य, छिचोर, चैनी, नीच कृत्य करणार असा होतो. छगन - नारद, बापू - चातक, बालू - गुराखी, धारा - रीतभात, बावी - भगवती किंवा स्त्री भोसडा - भसद म्हणजेच पश्चात, गुद्द अर्थातच आपनमार्गाने जन्मलेला... बारबोडी - वारवधूक, रांडांचा नायक किंवा नपुसंकद, कारटा- १० -१२ च्या भोजनाला गेलेला, किडा - कीद म्हणजेच ज्ञान किंवा ज्ञाता.. त्यानुसार एखाद्या गोष्टीचे आघाद ज्ञान असणे, खराब म्हणजे गाढवाचा मूत, खातापिता - पोरंबाळं झालेला माणूस याठिकाणी खाण्यापिण्याचा संबंध नाही.
Dr. Satish Kadam ९४२२६५००४४
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.