रंडी मश्जिद
नाव ऐकूनच आपल्या मनात अनेक शंका कुशंका
निर्माण व्हायला लागतील. खरंही आहे, हो ! ही वास्तव कथा आहे एका
असाह्य स्त्रीची. जी हिंदू धर्मात जन्मली, मुस्लिम बनविली, ख्रिश्चनासोबत लग्न झाले. तरीही
आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाली. शेवटी लोकांना तिला रंडी ठरवले.
19 जुलै 2020 वार रविवार यादिवशी भारतात सर्वदूर भयानक स्वरूपाचा वादळी पाऊस पडला. दिल्लीतर जरा जास्तच पडला. या पावसामुळे अनेकठिकाणी पडझड झाली. आणि दुसर्या दिवशी पेपरात बातम्या झलकल्या. त्यात एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे वीज कोसळून जुन्या दिल्लीतल्या ‘ रंडी मस्जिदीचा घुमट पडला’. जुन्या काळातील शहाजनाबाद म्हणजे पुराणी दिल्ली. दिल्लीतील लाल कौन भागात ही मस्जिद असून तिथल्या लोकांना हा शब्द नवा नाही. परंतु इतरांच्या मानाने तो निश्चितच वेगळा आहे. नावात काहीतरी इतिहास दडलाय याची जाणीव झाली आणि चाळली पुस्तकं, आण सापडला इतिहास !
खूप पानं पालटली तेव्हा White mughal, Sahajanabad : The Living City of Old Dehli, The last Mughal आणि British Library तील पत्राचा डॉ.सतीश कदम यांनी केलेल्या अभ्यासानुसार 1868 -70 च्या दरम्यान पुण्यातील एका ब्राम्हण कुटुंबात तिचा जन्म झाला.( White Muughals – William Dalrymple, Page 183). तिच्या कुळ आणि नावाबाबत विशेष संदर्भ नसलीतरी एकेठिकणी तिचे नाव चंपा सांगितले आहे. एकाद्या ब्राम्हण पुरुषापासून नर्तकीला झालेली ती मुलगी असावी. गुलाम म्हणून तिला दिल्लीतल्या मुगल सरदाराला विकले आणि तिचे नाव झाले – बिबी महरुतून मुबारक उल निसा बेगम अर्थातच ‘मुबारक बेगम ’. पुण्यातली मुलगी आता दिल्लीतल्या नाबाबाची मने जिंकून मुबारक बेगम नावाने प्रसिद्ध झाली.
याचवेळी इंग्लडमधील बोस्टनमध्ये 12 फेब्रुवारी 1758 रोजी जन्मलेल्या ( Devid Ochterlony ) डेविड ऑक्टरलॉनी या इंग्रज तरुणाने ईस्ट इंडिया कंपनीत लेफ्टनंट म्हणून 1778 साली भारतात आपली कारकीर्द सुरू केली. पुढे त्याने इंग्रज – नेपाळ तसेच मराठा इंग्रज युद्धात इंग्रजाकडून मोठी कामगिरी केली. त्यानंतर मेजर जनरलच्या हुद्दयावर पोहोचून तो 1803 ते 1825 या दरम्यान शहा आलम दूसरा आणि अकबर दूसरा यांच्या कालखंडात मोगलांचा रेसिडेंट म्हणून दिल्लीत वास्तव्यास राहिला. मोगल सम्राटाची त्याच्यावर एवढी मर्जी बसली की, ते त्याला “ अख्तर लोणी” म्हणायचे. या दरम्यान तो पक्का हिंदुस्तानी बनला. कुर्ता पायजमा, शेरवाणी वर फेटा अशा पोषाखात तो नेहमी हुक्काही ओढायचा. नाचगाण्याचाही गड्याला भारी शौक होता. एकावर एक करत तब्बल 13 लग्ने केली.13 बायका घेऊन हत्तीच्या अंबारीत बसून डेविड दिल्लीत फेरफटकाही मारायचा. त्यातील त्याची सर्वात आवडती बायको म्हणजे‘मुबारक बेगम’. मुस्लिमाकडून ती त्याच्याकडे कशी गेली याची माहीत नाही.
परंतु
डेविडवर तिची छाप पडली. ती स्वत:ला जनरल बेगम म्हणून घ्यायची. तरी तिने मुस्लिम धर्म
काही सोडला नाही. या दरम्यान मक्केची यात्राही केली. डेविडपासून तिला दोन मुलीही झाल्या, त्यांचे विवाह तिने मुस्लिम नबाबाच्या खानदानात लावले. डेविडने तिला पूर्ण
स्वातंत्र्य दिलेतरी तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. त्यातूनच त्याने स्वखर्चाने एक
बाग तयार करून तिला “ मुबारक बाग” असे नाव दिले. तर मुबारक बेगमने आपल्यासाठी एक घर
बांधले, त्याला “ मुबारक बेगम की मंजिल” म्हटले जायचे. शिवाय
आपली आठवण म्हणून तिने एक मस्जिदही बांधली.
पुढे 1825 साली मेरट याठिकाणी मेजर जनरल डेविड ऑक्टरलॉनीचे निधन झाले. त्याचे प्रतिकात्मक स्मारक दिल्लीत उभारले गेले. विधवा झालेल्या मुबारक बेगमने पुढे मुगल अमीर विलायतअली खानाबरोबर निकाह लावला. यातील महत्वाची बाब म्हणजे 1857 ला भारतात इंग्रजाविरोधात जे बंड झाले त्यात मुबारक बेगमने उघडपणे भाग घेतला. यावेळी लोकांनी दिल्लीत असणारे डेविडचे स्मारक उद्धवस्त करून टाकले. तर मुबारकचा इतिहास अज्ञात आहे.
इंग्रजी
कागदपत्रांनुसार 1238 हिजरी म्हणजे 1822 – 23 च्या दरम्यान मुबारक बेगमने 29 X
14 फुट आकारची एक मस्जिद बनवून
घेतली. कागदोपत्री तिला लाल मस्जिद म्हटले गेले आहे. मात्र त्या मास्जिदिवर “ मुबारक
बेगम मस्जिद” असे नाव आहे. हिंदूतून मुस्लिम झाली म्हणून हिंदूंचा द्वेष, मुसलमानाकडून ख्रिश्चनाकडे गेली त्यानंतर परत मुस्लिमाकडे आली म्हणून तिला
कुठल्याच धर्माने मानसिकदृष्ट्या आपले मानले नाही. दिल्लीतल्या त्या मस्जिदीत आजही
नमाज पडला जातो वर मुबारक बेगम मस्जिद म्हणून मोठा फलकही आहे, परंतु व्यवहारात सर्वजण या मास्जिदीला “रंडी मस्जिद” म्हणूनच ओळखतात. लाल
दगडातल्या या मस्जिदीला एकूण तीन घुमट असून सर्वात उंच असणारा मधला घुमट वीज पडून कोसळला
असलातरी 197 वर्षाच्या या इमारतीला कुठलाही धोका नाही. लोकांनी
रंडी म्हटलेतरी वयाच्या 12 व्या वर्षात आपल्यावर झालेल्या अत्याचारातून सावरत वास्तूच्यारूपात ती
आजही उभी आहे.
प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.