सातव्या निजामाचे अजब किस्से
१७ सप्टेंबर १९४८ पूर्वी भारतात एकंदर ५६५ संस्थाने होती. त्यात हैदराबादचे संस्थान हे चलन, दळणवळण, रेल्वे, संरक्षणव्यवस्थेसह सर्वांत बलशाली संस्थान होते. १७२४ ला औरंगजेबाचा सरदार मिर कमरूद्दिनने निजाम उल मुल्क नावाची पदवी घेऊन हैदराबाद येथे हे राज्य निर्माण केले. त्यामुळे सत्तेवर येणा-या प्रत्येक राजास निजाम म्हटले गेले. त्यानुसार स्वातंत्र्यापर्यंत एकूण ७ निजाम होऊन गेले. निजाम या शब्दाचा अर्थ होतो परिसराची व्यवस्था पाहणारा. याउलट शेवटच्या म्हणजे सातव्या निजामाने कारभार करून ३७ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने स्वत:चीच व्यवस्था पाहिली. जगातील श्रीमंतांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर असून त्याचे अनेक चित्रविचित्र किस्से जगजाहीर आहेत.
१९१० साली धाराशिवचे नामांतर उस्मानाबाद करण्यात आले. ते सातवे निजाम म्हणजे मीर उस्मानअली जंगबहाद्दर सिद्दिकी ६ वे निजाम मीर महेबूब अलीला जोहराबेगम नावाच्या एका हिंदू स्त्रीपासून झालेले उस्मानअली हे अनौरस संतान असूनही आजपर्यंतच्या निजामात सर्वांत प्रदीर्घ राज्यकारभार करून परिचित झाले. उस्मानअलीने दुल्हन पाशा बेगमसह इतर ६ विवाह केले शिवाय अन्य ४२ स्त्रियांचा भरणा त्यांच्या जनानखान्यात होता. त्यामुळे आपल्या हयातीत त्यांना ५० मुले, ४६ नातवंडे, १६ सुना व ४४ दासीपुत्र पाहता आले. काही ठिकाणी त्यांच्या मुलांची संख्या १४९ सांगितली आहे. श्रीमंतीबरोबर सर्व मुस्लिमांचा खलिफा होता यावे म्हणून त्याने पहिल्या पत्नीपासून झालेली दोन मुले आझम आणि मोअझमचा विवाह तुर्कस्तानच्या राजाच्या मुली दुर्देशावर आणि निलोफर यांच्याशी लावून दिला होता. आपणाला मुलीपासून होणा-या नातवाकडून धोका होऊ शकतो म्हणून त्याने आपल्या मुलीचा विवाह केला नाही. तर अनौरस असल्याने आपल्या आईला कुणी किंमत देत नाही म्हणून तो शेवटपर्यंत दररोज न चुकता आईला भेटत राहिला. मृत्यूनंतर तिची कबर बांधल्यानंतरही कबरीचे दर्शन घेऊन त्याने मातृभक्ती निभावली.
आंध्र, तेलंगणा, उत्तर कर्नाटक व संपूर्ण कर्नाटकावर अधिराज्य गाजविणा-या निजामाने २२,९९,६३ बिलीयन डॉलरची संपत्ती कमावली. त्याच्या टेबलवरील पेपरवेट हा जैकब नावाचा असली हिरा असून त्याची आजची किंमत ३५० कोटी रुपये होते. संपत्ती जमा करण्याचा त्याला हव्यास जडल्याने वेगवेगळ्या रूपाने ती जमा करण्याचा त्याने सपाटा लावला. सोनेनाणे तर एवढे जमा झाले की घराच्या विविध भागात ते पुरून टाकले तर उडणा-या पडद्यांनाही वजनदार सोने अडकवून सोडले. सर्फेखास जहागिरीतून त्याला वार्षिक १५ कोटी मिळत असूनही त्याने पैसा जमा करण्यासाठी वेळोवेळी दरबार भरवून ५, १० रुपये स्वीकारले. असेच एकदा ५ रुपयांचा शिक्का स्वीकारत असताना तो शिक्का खाली पडून घरंगळायला लागला. तेव्हा आपले राजेपण विसरून त्याने गुडघ्यावर रांगत जाऊन सर्वांसमक्ष ते पैसे पकडून आनंद घेतला. जमा झालेली बरीच संपत्ती त्याने इंग्लंडच्या बँकेत टाकली. शेवटपर्यंत ती तशीच पडून राहिली. ती मिळविण्यासाठी निजामाचे शेकडो वारसदार आजही भारत-पाकिस्तानच्या राज्यकत्र्यांकडे हेलपाटे घालताहेत.
करोडोची संपत्ती बाळगणारा उस्मानअली वैयक्तिक पातळीवर मात्र कमालीचा कंजूष होता. त्याचा दर आठवड्याचा खर्च फक्त २० रुपये होता. पूर्वीच्या निजामांनी एकदा घातलेले कपडे पुन्हा कधी वापरले नाहीत.
परंतु उस्मानसाहेब एकच ड्रेस कित्येक वर्षे रफू करून जीर्ण होईपर्यंत वापरायचे. तर डोक्यावरील लाल गोंड्याची काळी टोपी तेलाने काळीकुट्ट झाली तरी ते तसेच वापरायचे. पैसे लागतात म्हणून उशिराने केस कापायचे हे नेहमीचेच. पायातील पायतान फाटेपर्यंत तसेच फरफटायचे आणि ते मागवायचे ठरले की बीदरच्या मौला नावाच्या चांभाराकडून अगदी फुकट यायचे. तासन्तास एक हात तुटलेली लाकडी खुर्ची टाकून ते व्हरांड्यात बसून राहायचे. कित्येक वर्षांपासून वापरात आणलेली फाटकी चटई ते स्वत:च उचलून ठेवायचे. थंडीसाठी वापरायचे ब्लँकेट फाटल्यामुळे ते नवीन आणण्यासाठी सचिवाकडे त्यांनी १५ रुपये दिले. सचिव बाजारातून परत आला कारण ब्लँकेटची किंमत आता १८ रुपये झाली होती. ३ रुपयांसाठी निजामाने जुन्याच ब्लँकेटवर पुढची कित्येक वर्षे घालवली.
एका बाजूला हावरटपणा व त्यासाठी दिसेल ते ढापण्याची वृत्ती अधिकच बळावली होती. असेच एकदा लखनौचा व्यापारी असगरअलीने अत्तराच्या दुकानाच्या उद्घाटनाकरिता निजामाला आमंत्रित केले होते. एवढ्या मोठ्या माणसामुळे आपला फायदा होईल म्हणून त्याने चांदीचे कुलूप आणि त्याला सोन्याची चावी बनविली. प्रत्यक्षात चावी लावून कुलूप उघडून उद्घाटन करत असताना निजामाने ते कुलूप सरळ आपल्या खिशात
घातले. एवढ्या मोठ्या माणसाला मागायचे तरी कसे. याउपर त्याने ५० हजारांचे अत्तर बांधून घेतले. पुढे अनेक दिवस चकरा मारूनही संबंधित व्यापा-याला ना कुलूप मिळाले ना अत्तराचे पैसे.
सातवा निजाम उस्मानअलीचे वर्तन काही प्रमाणात औरंगजेबासारखे असून एवढी संपत्ती असूनही त्याने त्याचा कधी दुरुपयोग केला नाही. शिवाय खाण्यापासून कपड्यापर्यंत नेहमी कंजुषी केली. त्याच निजामाची दुसरी एक बाजू अतिशय वेगळी पाहण्यास मिळते. तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर निजाम राजवटीखाली मोडत होते. मुस्लिम राजवट असूनही भाविकांना त्याचा कधी त्रास झाला नाही. याउलट तुळजापुरातील भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळातील वाद विकोपाला गेल्याने १९०९ साली तुळजाभवानी मंदिर सरकारच्या ताब्यात घेतले मात्र याच वेळी मंदिर प्रशासनाकरिता जो अधिकारी नेमला जाईल तो हिंदूच असेल अशी कायद्यात तरतूद करून ठेवली. आजही मंदिराचा कारभार निजामाने घालून दिलेल्या कायद्यानुसारच चालतो हे महत्त्वाचे आहे. याशिवाय नवरात्रीमध्ये संपूर्ण मंदिराला निजाम प्रशासनाच्या वतीने रोषणाई केली जाते. निजामाचा दिवाण चंदूलालच्या वतीने देवीला दुपारचा नैवेद्य दिला जायचा. आजही ती प्रथा कायम आहे.
मुस्लिम राजवटीत हिंदू मंदिरांचे पावित्र्य जपता यावे म्हणून तुळजापूरची जहागिर रावरंभा निंबाळकरांकडे दिली होती. त्यांनीच मंदिर परिसरातील मुख्य दरवाज्यापासून आतील ओव-यांचे बांधकाम केलेले आहे.
एकदा निजाम आपल्या गाडीने जात असताना त्यांच्या गाडीने एका शेळीला धडक दिली. एवढा मोठा राजा असूनही त्याने आपली गाडी थांबविली. दवाखान्यात पाठवून त्या शेळीवर इलाज केला. पुढे हीच शेळी शेवटपर्यंत निजामाच्या कोठीच्या आवारात सांभाळली गेली हे वेगळेपण आहे. शालेय शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून प्राथमिक शाळा काढल्या व यातून मुलांना मोफत शिक्षण देण्यात आले. बहुतांश शिक्षक हे मुस्लिम असले तरी पहिल्या दिवसाची सुरुवात ही सरस्वती पूजनाने व्हायची. संस्थानाच्या विलीनीकरणामुळे गृहमंत्री सरदार
पटेलांचे राजकीय मतभेद तीव्र होऊनही निजामाने त्यांना आवडणारी पुस्तके पाठविण्याची काळजी घेतली. याशिवाय भेट म्हणून एक हस्तिदंताची काठीही पाठवून दिली होती. अशारीतीने एकेठिकाणी बसून निजामाने आपली सत्ता आपल्या पद्धतीने उपभोगली. ८५ टक्के हिंदू असलेल्या प्रजेवर २२५ वर्षे निजाम घराण्याने राज्यकारभार केला. तरीपण १९३० पर्यंत कुठेही जातीय दंगल झाली नव्हती. पुढे इत्तेहादुलसारख्या काही संघटनांनी निजाम प्रशासनाला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले. त्यामुळे धर्मनिरपेक्ष प्रशासनाची दिशा बदलली. १९४६ ला यात कासिम रझवीने प्रवेश केला आणि सारी दृष्टीच बदलून गेली. रमजानच्या वेळी हिंदूंचे सण आले तर पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले. त्यातच निजामाला इंग्रज आणि पाकिस्तानची फूस मिळाल्याने दिवसेंंदिवस परिस्थिती अधिकच बिघडली.
शेवटी १७ सप्टेंबर १९४८ ला पोलिस कारवाईने निजामाचे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. शेवटी हैदराबाद आकाशवाणी केंद्रावर जाऊन निजामाने लोकांना संबोधित करावे असे सांगण्यात आले तेव्हा एवढ्या छोट्याशा रेडिओमध्ये आपण कसे बसणार याचीही त्याने विचारणा केली होती. यावरून त्यांचा आवाका ध्यानात येतो. विशेष म्हणजे पोलिस कारवाईनंतर भारत सरकारने याच निजामाला हैदराबाद राज्याचे राज्यप्रमुख नेमले होते. शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी १९६७ रोजी शेवटच्या निजामाने जगाचा निरोप घेतला.
डॉ. सतीश कदम
मोबा. ९४२२६ ५००४४
१९१० साली धाराशिवचे नामांतर उस्मानाबाद करण्यात आले. ते सातवे निजाम म्हणजे मीर उस्मानअली जंगबहाद्दर सिद्दिकी ६ वे निजाम मीर महेबूब अलीला जोहराबेगम नावाच्या एका हिंदू स्त्रीपासून झालेले उस्मानअली हे अनौरस संतान असूनही आजपर्यंतच्या निजामात सर्वांत प्रदीर्घ राज्यकारभार करून परिचित झाले. उस्मानअलीने दुल्हन पाशा बेगमसह इतर ६ विवाह केले शिवाय अन्य ४२ स्त्रियांचा भरणा त्यांच्या जनानखान्यात होता. त्यामुळे आपल्या हयातीत त्यांना ५० मुले, ४६ नातवंडे, १६ सुना व ४४ दासीपुत्र पाहता आले. काही ठिकाणी त्यांच्या मुलांची संख्या १४९ सांगितली आहे. श्रीमंतीबरोबर सर्व मुस्लिमांचा खलिफा होता यावे म्हणून त्याने पहिल्या पत्नीपासून झालेली दोन मुले आझम आणि मोअझमचा विवाह तुर्कस्तानच्या राजाच्या मुली दुर्देशावर आणि निलोफर यांच्याशी लावून दिला होता. आपणाला मुलीपासून होणा-या नातवाकडून धोका होऊ शकतो म्हणून त्याने आपल्या मुलीचा विवाह केला नाही. तर अनौरस असल्याने आपल्या आईला कुणी किंमत देत नाही म्हणून तो शेवटपर्यंत दररोज न चुकता आईला भेटत राहिला. मृत्यूनंतर तिची कबर बांधल्यानंतरही कबरीचे दर्शन घेऊन त्याने मातृभक्ती निभावली.
आंध्र, तेलंगणा, उत्तर कर्नाटक व संपूर्ण कर्नाटकावर अधिराज्य गाजविणा-या निजामाने २२,९९,६३ बिलीयन डॉलरची संपत्ती कमावली. त्याच्या टेबलवरील पेपरवेट हा जैकब नावाचा असली हिरा असून त्याची आजची किंमत ३५० कोटी रुपये होते. संपत्ती जमा करण्याचा त्याला हव्यास जडल्याने वेगवेगळ्या रूपाने ती जमा करण्याचा त्याने सपाटा लावला. सोनेनाणे तर एवढे जमा झाले की घराच्या विविध भागात ते पुरून टाकले तर उडणा-या पडद्यांनाही वजनदार सोने अडकवून सोडले. सर्फेखास जहागिरीतून त्याला वार्षिक १५ कोटी मिळत असूनही त्याने पैसा जमा करण्यासाठी वेळोवेळी दरबार भरवून ५, १० रुपये स्वीकारले. असेच एकदा ५ रुपयांचा शिक्का स्वीकारत असताना तो शिक्का खाली पडून घरंगळायला लागला. तेव्हा आपले राजेपण विसरून त्याने गुडघ्यावर रांगत जाऊन सर्वांसमक्ष ते पैसे पकडून आनंद घेतला. जमा झालेली बरीच संपत्ती त्याने इंग्लंडच्या बँकेत टाकली. शेवटपर्यंत ती तशीच पडून राहिली. ती मिळविण्यासाठी निजामाचे शेकडो वारसदार आजही भारत-पाकिस्तानच्या राज्यकत्र्यांकडे हेलपाटे घालताहेत.
करोडोची संपत्ती बाळगणारा उस्मानअली वैयक्तिक पातळीवर मात्र कमालीचा कंजूष होता. त्याचा दर आठवड्याचा खर्च फक्त २० रुपये होता. पूर्वीच्या निजामांनी एकदा घातलेले कपडे पुन्हा कधी वापरले नाहीत.
एका बाजूला हावरटपणा व त्यासाठी दिसेल ते ढापण्याची वृत्ती अधिकच बळावली होती. असेच एकदा लखनौचा व्यापारी असगरअलीने अत्तराच्या दुकानाच्या उद्घाटनाकरिता निजामाला आमंत्रित केले होते. एवढ्या मोठ्या माणसामुळे आपला फायदा होईल म्हणून त्याने चांदीचे कुलूप आणि त्याला सोन्याची चावी बनविली. प्रत्यक्षात चावी लावून कुलूप उघडून उद्घाटन करत असताना निजामाने ते कुलूप सरळ आपल्या खिशात
घातले. एवढ्या मोठ्या माणसाला मागायचे तरी कसे. याउपर त्याने ५० हजारांचे अत्तर बांधून घेतले. पुढे अनेक दिवस चकरा मारूनही संबंधित व्यापा-याला ना कुलूप मिळाले ना अत्तराचे पैसे.
सातवा निजाम उस्मानअलीचे वर्तन काही प्रमाणात औरंगजेबासारखे असून एवढी संपत्ती असूनही त्याने त्याचा कधी दुरुपयोग केला नाही. शिवाय खाण्यापासून कपड्यापर्यंत नेहमी कंजुषी केली. त्याच निजामाची दुसरी एक बाजू अतिशय वेगळी पाहण्यास मिळते. तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर निजाम राजवटीखाली मोडत होते. मुस्लिम राजवट असूनही भाविकांना त्याचा कधी त्रास झाला नाही. याउलट तुळजापुरातील भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळातील वाद विकोपाला गेल्याने १९०९ साली तुळजाभवानी मंदिर सरकारच्या ताब्यात घेतले मात्र याच वेळी मंदिर प्रशासनाकरिता जो अधिकारी नेमला जाईल तो हिंदूच असेल अशी कायद्यात तरतूद करून ठेवली. आजही मंदिराचा कारभार निजामाने घालून दिलेल्या कायद्यानुसारच चालतो हे महत्त्वाचे आहे. याशिवाय नवरात्रीमध्ये संपूर्ण मंदिराला निजाम प्रशासनाच्या वतीने रोषणाई केली जाते. निजामाचा दिवाण चंदूलालच्या वतीने देवीला दुपारचा नैवेद्य दिला जायचा. आजही ती प्रथा कायम आहे.
मुस्लिम राजवटीत हिंदू मंदिरांचे पावित्र्य जपता यावे म्हणून तुळजापूरची जहागिर रावरंभा निंबाळकरांकडे दिली होती. त्यांनीच मंदिर परिसरातील मुख्य दरवाज्यापासून आतील ओव-यांचे बांधकाम केलेले आहे.
एकदा निजाम आपल्या गाडीने जात असताना त्यांच्या गाडीने एका शेळीला धडक दिली. एवढा मोठा राजा असूनही त्याने आपली गाडी थांबविली. दवाखान्यात पाठवून त्या शेळीवर इलाज केला. पुढे हीच शेळी शेवटपर्यंत निजामाच्या कोठीच्या आवारात सांभाळली गेली हे वेगळेपण आहे. शालेय शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून प्राथमिक शाळा काढल्या व यातून मुलांना मोफत शिक्षण देण्यात आले. बहुतांश शिक्षक हे मुस्लिम असले तरी पहिल्या दिवसाची सुरुवात ही सरस्वती पूजनाने व्हायची. संस्थानाच्या विलीनीकरणामुळे गृहमंत्री सरदार
पटेलांचे राजकीय मतभेद तीव्र होऊनही निजामाने त्यांना आवडणारी पुस्तके पाठविण्याची काळजी घेतली. याशिवाय भेट म्हणून एक हस्तिदंताची काठीही पाठवून दिली होती. अशारीतीने एकेठिकाणी बसून निजामाने आपली सत्ता आपल्या पद्धतीने उपभोगली. ८५ टक्के हिंदू असलेल्या प्रजेवर २२५ वर्षे निजाम घराण्याने राज्यकारभार केला. तरीपण १९३० पर्यंत कुठेही जातीय दंगल झाली नव्हती. पुढे इत्तेहादुलसारख्या काही संघटनांनी निजाम प्रशासनाला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले. त्यामुळे धर्मनिरपेक्ष प्रशासनाची दिशा बदलली. १९४६ ला यात कासिम रझवीने प्रवेश केला आणि सारी दृष्टीच बदलून गेली. रमजानच्या वेळी हिंदूंचे सण आले तर पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले. त्यातच निजामाला इंग्रज आणि पाकिस्तानची फूस मिळाल्याने दिवसेंंदिवस परिस्थिती अधिकच बिघडली.
डॉ. सतीश कदम
मोबा. ९४२२६ ५००४४
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.