Men's Underwear Index ( MUI )

पुरुषाच्या अंडर वेअर खरेदीविक्रीवर देशाच्या अर्थव्यवस्थेचे निदान करता येते ?
 

  
याला Men's Underwear Index ( MUI ) म्हणतात. 

इ. स. १९८७ ते २००६ या दरम्यान अमेरिकेच्या फेडरल रिसर्व्हच्या चेअरमनपदी राहिलेल्या अॅलन ग्रीनस्पॅन  यांनी हा सिद्धांत मांडलेला असून फेडरल रिसर्व्ह म्हणजेच आपल्या भाषेत अमेरिकेची रिसर्व बँक मानली जाते..  त्यांच्यामते लोकांकडे पैसे असतीलतर देशातील पुरुष मोठ्या प्रमाणात अंडर वेअर खरेदी करतात. आणि पैशाची कमतरता असेलतर ते अंतरवस्त्र असल्याने त्यामध्ये भागवाभागवी करतात. हा सिंद्धांत भारताला कितपत लागू पडतो हे माहित नाही. तरीपरंतु भारताच्या अंडरवेअर खरेदीत चांगलीच घट झालेली असून केवळ vip ब्रँडचा विचार केला तर त्यांच्या विक्रीत २० % घट झालेली आहे. 
म्हणूनच अॅलन ग्रीनस्पॅनने अंडरवेअरच्या खरेदी विक्रीला Underwear index किंवा Economics Index म्हटलेले आहे.. भारतातील ६०% जनता ही ग्रामीण भागात राहात असल्याने हा सिद्धांत कितपत लागू पडतो हा अभ्यासाचा भाग असलातरी भारताची अर्थव्यवस्थेत झालेली घसरण फाटलेल्या अंडरवेअरसारखी चिंतेची बाब आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या