सोलापुर कोरोना. कॉम

सोलापुर कोरोना. कॉम 


इमानातला कोरोना, निघाला थेट सोलापूरला 
वाटेत भेटलं त्याला मोडनिंब, चौफुला,
तसा तो जास्तीचा चेकाळला,
वर म्हणतो कसा.. 
मी नाय खात कुठल्या मालकाला  II १ II 

त्याला वाटलं, इथंतर सर्वकाही लोकमंगल य   
तवा घुसावं जोरात.. 
अरे रे, तुला काय माहित... 
इथला एक एक माणूस जपतो कष्टाच्या भाकरीला 
निघाला सुसाट, भेटलं बाळं 
तिथं नडला म्हलारीला II २ II 

मग ईचार करुनी निराळा 
गाठला सोलापूरचा जुळा 
तिथं सुयश म्हणाला , 
आम्ही नाय भेत अस्मानी - सुल्तानी संकटाला 
जरी असला तुझा नाद खुळा  II ३ II 

आता कॊरॊना सरकला सातरस्ताला 
तिथंतर  वाटच चुकला ... 
तेवढ्यात मान वाकडी करून दिलीप बोलला 
जर म्हटला एका दमात 
गेंटयाल, पोगूल, सादूल 
तर मानतो तुझ्या शर्तीला II ४ II 

तसा कोरोना झाला भ्रमितं 
करावया ईलाज, पोचला मेकॅनिक चौकात 
तिथं देत होता घोषणा, राजा राजवाड्यातल्या झोपडीत 
सदासर्वदा आम्हीच दिसतो का दलित... II ५ II sk 

तिथं उभा मनोहर 
त्याने वडला सपाटा महेशकडे पाहतं 
जरी आमचं तोंड फटकळ 
आम्हा सिद्धरामाची शिकवण 
इथं नांदती अठरा पगड, बारा बलुतं ... 
जा बे ss नायss तर 
गुदगुल्या करून मारील आमचा दीपक II ६ II 

खबर गेली स्वामीला 
घेतलं फैलावर कोरोनाला 
कुठं गेली रे तुझी अक्कल ... 
उद्या कळालं जर इटोबाला 
लावील बुक्का तुझ्या माथ्याला 
आहेच तुळजाभवानी, आठव ! कसा मारला महिषासुराला II ७ II 

 कोरोना पडला चक्रात  
अरे, हे गावतर कोटणीसाचं 
एका हातानं घ्यावं आण दुसऱ्यानं हातानं द्यावं 
सॉरी, जपतो मी शेजार धर्माला 
करून शेटलमेंट, देतो तुम्हा नई जिंदगीला  
निघतो पुढच्या प्रवासाला II ८ II 

एवढ्यात बरंचकाही साठवलेले 
काका म्हणाले,
आत्तातरी माना साहेबाच्या दूरदृष्टीला 
 सांगून हायकमांडला
रोखलं विमानतळाला 
म्हणून ! कोरोना SSS 
एंट्री नाही तुला सोलापूरला II ९ II 

डॉ. सतीश कदम ९४२२६५००४४ 
   







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या